Chandrayaan 2: शेवटचे दोनच दिवस इस्त्रोच्या हाती अन्यथा चांद्रयान-2 मोहीम संपुष्टात?
मात्र, 7 सप्टेंबर 2019 रोजी चंद्रावर उतरत काही तांत्रिक बिघाड झाला आणि अचानक विक्रम लँडरशी इस्त्रोचा संपर्कच तुटला. तेव्हापासून विक्रम लँडरसोबत संपर्क साधण्याचे प्रयत्न आजपावेतो सुरुच आहेत.
चांद्रयान 2 मोहिमेतील संपर्क तुटलेल्या विक्रम लँडर सोबत संपर्क साधण्याचा भारतीय अंतराळ संस्था (Indian Space Research Organisation) अर्थातच इस्त्रो (ISRO) सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र, त्याला अद्यापही यश आले नाही. आता तर विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठई इस्त्रोकडे काही तासांचाच अवधी शिल्लख आहे. हा कालावधी केवळ दोन दिवसांचाच असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन दिवसांत विक्रम लँडरशी संपर्क झाल्यास ही मोहीम कायम ठेवण्यात येईल. अन्यथा इस्त्रोला ही मोहीम स्थगित करावी लागेल. कारण, या दोन दिवसांनंतर चंद्राच्या दक्षिण धृवावर रात्र सुरु होईल. विक्रम लँडर रोव्हरची रचना ही एक चांद्रदिवस म्हणजेच प्रथ्वीवरील 14 दिवस काम करु शकेन अशा पद्धतीने करण्यात आली होती.
भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. मात्र, 7 सप्टेंबर 2019 रोजी चंद्रावर उतरत काही तांत्रिक बिघाड झाला आणि अचानक विक्रम लँडरशी इस्त्रोचा संपर्कच तुटला. तेव्हापासून विक्रम लँडरसोबत संपर्क साधण्याचे प्रयत्न आजपावेतो सुरुच आहेत.दरम्यान, 8 सप्टेंबर रोजी चांद्रयान 2 वर असलेल्या ऑनबोर्ड कॅमेऱ्याला लँडरचे चंद्रभूमीवर दर्शन घडल्याचे इस्त्रोने म्हटले होते. मात्र त्यानंतर लँडरशी संपर्क तूटला तो तूटलाच.
दरम्यान, अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था `नासा'ने मदतीचा हात पुढे केला. नासाचे एक ऑर्बिटर विक्रम लँडर असलेल्या जागेपासून प्रवास करणार होतं. परंतू त्याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा इस्त्रोकडून अद्यापही प्रयत्न सुरुच आहे. मात्र, अद्यापही त्याला यश आले नाही. दरम्यान, जनतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि दाखवलेल्या विश्वासाबद्दल इस्त्रोने आभार मानले आहेत. (हेही वाचा, Chandrayaan 2: NASA चे ऑर्बिटर धाडणार विक्रम लँडरचा फोटो, 17 सप्टेंबर पर्यंत करावी लागेल प्रतीक्षा)
इस्त्रो ट्विट
चांद्रयान 2 हे 22 जुलै 2019 या दिवशी चंद्राच्या दिशेने झेपावले. हे यान तब्बल 48 दिवसांनंतर चंद्राच्या भूमिवर उतरणार होते. नियोजित कार्यक्रमानुसार हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर साधारण 6 ते 7 सप्टेंबर दरम्यान उतरणे अपेक्षीत होते. भारताचा हा प्रयोग जवळपास पूर्ण होत आला होता. मात्र, अंतिम क्षणी विक्रम लँडरशी संपर्क तुटला आणि हा उपक्रम यशस्वीतेकडे जाण्यात खोडा निर्माण झाला. विक्रम लँडरशी संपर्क झाल्यास चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.