Chandra Grahan 2020 Live Streaming: 10 जानेवारीच्या रात्री छायाकल्प चंद्रग्रहण ऑनलाईन कसं आणि कुठे पहाल?

हे चंद्रग्रहण छायाकल्प चंद्रग्रहण (Penumbral Lunar Eclipse) असल्याने त्याच्याबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.

Representational Image (Photo Credits: pixabay)

Penumbral Lunar Eclipse Live Streaming:  ग्रहण या अवकाशातील अजुब्याचं खगोलप्रेमींना विशेष आकर्षण असतं. आज (10 जानेवारी) सन 2020मधील पहिलं चंद्रग्रहण अनुभवता येणार आहे. हे चंद्रग्रहण छायाकल्प चंद्रग्रहण (Penumbral Lunar Eclipse) असल्याने त्याच्याबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे. या चंद्रग्रहणाला ‘वोल्फ मून एकल्प्सि’ (Full Wolf Moon) म्हणून देखील ओळखलं जातं. यामध्ये आज चंद्र तपकिरी रंगाचा दिसणार आहे. त्यामुळे भारतासह ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका खंडामध्ये आज दिसणार्‍या या चंद्रग्रहणाचा थेट अनुभव घेता येत नसेल तर युट्युबवर तुम्हांला चंद्रग्रहणाचा (Chandra Grahan) अदभुत नजारा पाहता येणार आहे. Eclipses of 2020: भारतीय खगोलप्रेमींसाठी आगामी वर्षभरात 6 ग्रहणं, सुपरमून, ब्ल्यू मून अनुभवता येणार; पहिलं चंद्रग्रहण 10 जानेवारी दिवशी!  

चंद्रग्रहण ही खगोलीय स्थिती आज भारतामध्ये रात्री 11 च्या सुमरास पाहता येणार आहे. शुक्रवार 10 जानेवारी दिवशी रात्री 10.38 वाजता चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येण्यास प्रारंभ होईल. रात्री 12.40 वाजता जास्तीत जास्त म्हणजे 89टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येईल. उत्तररात्री 2.42 वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडेल. Chandra Grahan 2020: यंदा 10 जानेवारी दिवशी चंद्र ग्रहणाला काय दान करणं ठरू शकतं फायदेशीर?

चंद्रग्रहण 2020 चा नजारा इथे पहा लाईव्ह

आजचं चंद्रग्रहण हे छायाकल्प (Penumbral Lunar Eclipse) असल्याने त्याचे वेध पाळणं बंधनकारक नसेल. तसेच या काळात इतर ग्रहणांप्रमाणे मंदीरं बंद राहणार नाहीत. पंचागकर्त्यांच्या माहितीनुसार, ज्या चंद्रग्रहणामध्ये चंद्र पूर्णपणे झाकलेला नसेल, चंद्राची सावली पृथ्वी पडणार नसेल तर त्याचे वेध पाळण्याची गरज नसते.