Satya Nadella Pay Package: मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या पगारात 63% वाढ; मिळणार 665 कोटी रुपये

गेल्या वर्षी, 2023 मध्ये, त्यांना कामगिरीवर आधारित स्टॉक पुरस्कार म्हणून $39 दशलक्ष देण्यात आले आणि त्यांचा एकूण पगार $48.5 दशलक्ष होता.

Satya Nadella (PC - getty)

Satya Nadella Pay Package: मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे सीईओ सत्या नडेला (Microsoft CEO Satya Nadella) यांच्या पगारात मोठी वाढ झाली आहे. सत्या नडेला यांना 2024 मध्ये एकूण पगार आणि भत्त्यांसह तब्बल 79.1 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 670 कोटी रुपये मिळतील, जे 2023 च्या तुलनेत 63 टक्के अधिक आहे. 2014 नंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा, सत्या नडेला यांना $79.1 दशलक्ष पगार मिळेल. याआधी 2014 मध्ये, मायक्रोसॉफ्टचे सीईओ झाल्यानंतर त्यांना $84 दशलक्ष पगार देण्यात आला होता. सत्या नडेला यांच्या पगारात वाढ झाल्याची माहिती गुरुवारी नियामक फाइलिंगद्वारे समोर आली आहे.

नडेला यांच्या पगाराचा एक मोठा भाग परफॉर्मन्स बेस्ड स्टॉक अवॉर्ड्समधून येतो, ज्याचे मूल्य 2024 मध्ये $71.2 दशलक्ष आहे. गेल्या वर्षी, 2023 मध्ये, त्यांना कामगिरीवर आधारित स्टॉक पुरस्कार म्हणून $39 दशलक्ष देण्यात आले आणि त्यांचा एकूण पगार $48.5 दशलक्ष होता.

मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये 2024 मध्ये 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि गुरुवारी 24 ऑक्टोबर 2024 रोजी कंपनीचे मार्केट कॅप $3.6 ट्रिलियनपर्यंत वाढले आहे. कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये केलेली गुंतवणूक आणि तंत्रज्ञानामुळे महसूल वाढल्याने कंपनीचे मूल्यांकन वाढले आहे. कंपनीच्या 2024 च्या एकूण पगारात सत्या नडेला यांचा वाटा $2.5 दशलक्ष आहे, जो गेल्या वर्षी देखील इतकाच होता. त्यांनी रोख बोनस कमी करण्याचे आवाहन केले होते, ते मंडळाने मान्य केले. जर त्यांनी हे आवाहन केले नसते तर, त्यांना $10 दशलक्ष रोख बोनस मिळाला असता. (हेही वाचा: Tata Group to Create Jobs: टाटा समूहाने आखली 5 वर्षात 5 लाख नोकऱ्या देण्याची योजना; 'या' क्षेत्रांमध्ये उपलब्ध होणार रोजगार, जाणून घ्या सविस्तर)

याआधी 2022 मध्ये, नडेला यांना बोनस म्हणून $10 दशलक्ष मिळाले होते, जे 2023 मध्ये $6.4 दशलक्ष आणि 2024 मध्ये $5.2 दशलक्ष इतके कमी झाले आहे. दरम्यान, हैदराबादमध्ये जन्मलेले सत्या नडेला 1992 मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाले. 2014 मध्ये त्यांना कंपनीचे सीईओ बनवण्यात आले. 2021 मध्ये, कंपनीने त्यांना सीईओसह अतिरिक्त भूमिका आणि अध्यक्षपद दिले. नडेला यांना 2022 मध्ये विशेष सेवेसाठी पद्मभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif