Saregama Carvaan Karaoke म्युझिक प्लेअर भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत
Saregama ने भारतात त्यांचा नवा म्युझिक प्लेअर Saregama Carvaan Karaoke लॉन्च केला आहे. या म्युझिक प्लेअर मध्ये स्क्रिन दिली गेली आहे. ज्यामध्ये गाण्याचे लिरिक्स दिसणार आहेत.
Saregama ने भारतात त्यांचा नवा म्युझिक प्लेअर Saregama Carvaan Karaoke लॉन्च केला आहे. या म्युझिक प्लेअर मध्ये स्क्रिन दिली गेली आहे. ज्यामध्ये गाण्याचे लिरिक्स दिसणार आहेत. या व्यतिरिक्त डिवाइसमध्ये उत्तम साउंडसाठी 5 वॅटचे दोन स्पीकर दिले गेले आहेत. Saregama च्या कारवान कराओकेची किंमत 19,990 रुपये आहे. हा म्युझिक प्लेअर फक्त Metallic रेड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हे डिवाइस कंपनीच्या अधिकृत आणि ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर खरेदी करता येणार आहे. (boAt Watch Enigma भारतात लॉन्च, 10 दिवसांच्या बॅटरीलाइफसह युजर्सला मिळणार 'हे' दमदार फिचर्स)
Saregama Carvaan Karaoke मध्ये स्क्रिन दिली गेली आहे. ज्याचे रेज्यॉल्यूशन 800X480 पिक्सल आहे. या डिवाइसमध्ये 5W चे दोन स्पीकर दिले आहेत. त्याचसोबतस 1000 हून अधिक कराओके ट्रॅक मिळणार आहेत. जे इन-बिल्ट स्क्रिन मध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त Saregama Carvaan Karaoke हा एचडीएमआय पोर्टच्या माध्यमातून प्रोजेक्टरसोबत कनेक्ट करता येणार आहे. अन्य फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 5 हजार हिंदी गाणी मिळणार आहेत. डिवाइसमध्ये FM/AM रेडिओ सुविधा ही दिली जाणार आहे. तसेच म्युझिक प्लेअर दोन वायरलेस माइक आणि एका रिमोटसह येणार आहे. ज्याच्या माध्यमातून गाणी निवडण्यापासून ते ट्रॅक बदलता येणार आहे.
Tweet:
यामध्ये 4000mAh ची बॅटरी दिली आहे. जी सिंगल चार्जमध्ये 6 तासांचा बॅकअप देणार आहे. त्याचसोबत डिवाइसमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी युएसबी पोर्ट, एचडीएमआय आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे फिचर्स मिळणार आहेत. याचे वजन 2.3 किलोग्रॅम आहे.(Apple AirPods Max: अॅपल ने लॉन्च केले त्यांचे पहिले Over-Ear Wireless Headphones; पहा फीचर्स, किंमत)
या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने Saregama Carvaan GX01 इअरफोन भारतात लॉन्च केला होता. या इअरफोनची किंमत 1199 रुपये आहे. या इअरफोनचा वापर कोणत्याही डिवाइससाठी करता येणार आहे. तसेच 14.2mm डायनामिक ड्रायव्हर्स ही दिले असून जे सिग्नेचर Carvaan ट्युनिंगसह येणार आहे. याची साउंड क्वालिटी अधिक उत्तम आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)