अबब! 12 कोटींना मिळणार सॅमसंगचा नवा टीव्ही; पाहूया या सर्वात महागड्या टीव्ही चे फीचर्स आहेत तरी काय?

'द वॉल' असं या नव्या टीव्ही एडिशनचं नाव असून याची घोषणा वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात करण्यात आली होती. आता मात्र हा टीव्ही अखेर लाँच करण्यात आला आहे.

प्रतिकात्मक फोटो ( फोटो सौजन्य- Pixabay )

सॅमसंग कंपनीने भारतीय बाजारात आजवरचा सर्वात महागडा टीव्ही लाँच केला आहे. 'द वॉल' असं या नव्या टीव्ही एडिशनचं नाव असून याची घोषणा वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात करण्यात आली होती. आता मात्र हा टीव्ही अखेर लाँच करण्यात आला आहे. 'द वॉल' या टीव्हीची किंमत तुम्हाला नक्कीच भारावून सोडेल कारण त्याची कमीतकमी किंमत आहे 3.5 करोड रुपये तर त्यातील महागातला टीव्ही मिळत आहे तब्बल 12 करोड ला.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या महागड्या टीव्ही मध्ये असे काय वेगळे फीचर्स आहेत की त्याची किंमत करोडोंमध्ये मोजावी लागते. तर या टीव्हीची डिस्प्ले डेप्थ 30 एमएमपेक्षा कमी आहे. त्याचे तीन वेगळे मॉडेल्स लाँच करण्यात आले असून यात एआय पिक्चर एनहान्समेंट, हाय ब्राइटनेस, हाय कॉन्ट्रॅस्टचे असे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच वॉल मायक्रोएलईडीच्या डिस्प्लेमध्ये एआय अपस्केलिंग क्वांटम एचडीआर टेक्नॉलॉजी येते आणि याचा ब्राइटनेस 2000 नीटस् आणि 120Hz व्हिडिओ रेट आहे.

टेलिकॉम कंपन्यांचे 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत बेस्ट प्रीपेड प्लॅन, जाणून घ्या

आता पाहूया त्याचे तीन मॉडेल्स कोणते ते. पहिला टीव्ही हा 146 इंचांचा असून 4k हाय डेफिनेशन असेल. तर दुसऱ्या टीव्हीमध्ये 219 इंच 6k हाय डेफिनेशन फीचर्स असतील. आणि तिसरा टीव्ही 292 इंचाचा 8k हाय डेफिनेशनचा असेल. विशेष म्हणजे हे वॉल सिरीज टीव्ही 0.8 पिक्सल पिच टेक्नॉलॉजीसह येतात.

सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार याची विक्री 5 डिसेंबरपासून सुरू झाली आहे.