Samsung Galaxy S20+, Galaxy Buds+ चे BTS एडिशन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

साऊथ कोरियन स्मार्टफोन कंपनी सॅमसंग यांनी Samsung Galaxy S20+ आणि Galaxy Buds+ चे BTS एडिशन भारतात लॉन्च केले आहे. या नवीन लॉन्चमध्ये कंपनीने गॅलेक्सी S20+ नवीन पर्पल कलर आणि BTS म्युझिक बँडचा लोगो अॅड केला आहे.

Samsung Galaxy S20+ & Galaxy Earbuds+ BTS Edition (Photo Credits: Samsung India)

साऊथ कोरियन स्मार्टफोन कंपनी सॅमसंग यांनी Samsung Galaxy S20+ आणि Galaxy Buds+ चे BTS एडिशन भारतात लॉन्च केले आहे. या नवीन लॉन्चमध्ये कंपनीने गॅलेक्सी S20+ नवीन पर्पल कलर आणि BTS म्युझिक बँडचा लोगो अॅड केला आहे. त्याचप्रमाणे Galaxy Buds+ BTS एडिशनमध्ये ब्रँडचा लोगो आणि पर्पल शेड अॅड करण्यात आली आहे. Samsung Galaxy S20+, Galaxy Buds+ चे BTS एडिशन आणि Galaxy S20 Ultra Cloud White च्या प्री ऑर्डरर्स 9 जुलै पासून सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोअरवर उपलब्ध होणार आहेत.

Samsung Galaxy S20+ स्मार्टफोनमध्ये BTS प्रेरित असलेल्या थीम्स, स्पेशल वॉलपेपर्स, रिंगटोन्स आणि आयकॉन्स अॅड करण्यात आल्या आहेत. या मोबाईलमध्ये 6.7 इंचाचा Infinity-O AMOLED डिस्प्ले आहे. या मोबाईलमध्ये Exynos 990 चा ऑक्टोकोर प्रोसेसर आहे. 12GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज आहे. या मोबाईलमध्ये अॅनरॉईडचे 10 व्हर्जन असून One UI ऑपरेटिंग स्टिटम आहे. या स्मार्टफोन मध्ये 16MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा दिला असून 10MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

SamsungNewsroomIN Tweet:

Samsung Galaxy S20 Ultra-white वेरिएंटमध्ये 6.9 इंचाचा फुल एचडी पंचहोल डिस्प्ले असून 108MP चे चार रिअर कॅमेरा सेटअप आहे. त्याचप्रमाणे 40MPचा सेल्फी कॅमेरा दिला असून 16GB रॅम आणि 512 GB इंटरनल मेमरी आहे. सॅमसंग गॅलेक्सी S20+ BTS एडिशनची किंमत 87999 रुपये असून Galaxy Buds+ च्या BTS एडिशनची किंमत 14990 रुपये आहे. Samsung Galaxy S20 Ultra-white ची किंमत 97999 रुपये इतकी आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now