Republic Day Sale 2021: अॅपल iPhone 12 सिरीज 48,900 रुपयांपासून IndiaiStore वर उपलब्ध; जाणून घ्या आकर्षक ऑफर्स
यात आयफोन 12 61,900 रु., आयफोन 12 मिनी 48,900 रु. तर आयफोन 12 प्रो 1,02,900 रु. आणि आयफोन 12 प्रो मॅक्स 1,12,900 रुपयांना उपलब्ध असेल. आयफोन 12 सिरीज फोनवर IndiaiStore वेबसाईटवर आकर्षक डिस्काऊंट दिला जात आहे.
Republic Day Sale अंतर्गत आयफोन 12 सिरीज 48,900 रुपयांना उपलब्ध आहे. यात आयफोन 12 61,900 रु., आयफोन 12 मिनी 48,900 रु. तर आयफोन 12 प्रो 1,02,900 रु. आणि आयफोन 12 प्रो मॅक्स 1,12,900 रुपयांना उपलब्ध असेल. आयफोन 12 सिरीज फोनवर IndiaiStore वेबसाईटवर आकर्षक डिस्काऊंट दिला जात आहे. या ऑनलाईन वेबसाईटवरुन आयफोन मिनी आणि आयफोन 12 एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 6 हजार रुपयांचा कॅशबॅक तर डेबिट कार्डने खरेदी केल्यास 1,500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळण्याची शक्यता आहे.
आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 मॅक्स खरेदी करताना एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डसवर 5000 रुपयांचा कॅशबॅक तर डेबिट कार्डवर 1,500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. यासोबतच रिपब्लिक डे सेल अंतर्गत आयफोन खरेदी करु इच्छिणाऱ्या ग्राहकांना एक्स्ट्रा 3 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्याचबरोबर मोबाईल एक्सचेंज केल्यास 9 हजार रुपयांची सूट मिळेल. विशेष म्हणजे यात नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही देण्यात आला आहे.
या सर्व ऑफर्स एकत्रित केल्यास आयफोन 12 मिनी हा तुम्हाला 48,900 रुपयांना पडेल. या फोनची खरी किंमत 69,990 इतकी आहे. आयफोन 12 च्या 64 जीबी वेरिएंटची किंमत 79,900 रुपये असून या ऑफर अंतर्गत तुम्ही हा मोबाईल 61,900 रुपयांना विकत घेऊ शकता.
हा सेल केवळ 26 जानेवारी 2021 पुरता मर्यादीत आहे. अॅपलने 2020 च्या ऑक्टोबरमध्ये आयफोन 12 सिरीज लॉन्च केली होती. आयफोन 12 मिनी मध्ये 5.4 इंचाचा रेटीना retina XDR display दिला असून आयफोन 12 मध्ये 6.1 इंचाचा OLED display दिला आहे. आयफोन 12 सिरीजच्या सर्व फोनमध्ये अॅपलचा A14 बायोनिक चिपसेट दिला आहे. आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्समध्ये 2MP चा ट्रिपर रियर कॅमेरा दिला असून आयफोन 12 मिनी आणि आयफोन 12 मध्ये 12 MP चा ड्युअल रियल कॅमेरा देण्यात आला आहे. आयफोन 12 मिनी आणि आयफोन 12 हे मोबाईल 64GB, 128GB आणि 256GB वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. आयफोन 12 प्रो मॅक्स आणि आयफोन 12 प्रो 128GB, 256GB आणि 512GB या वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे.