Jio ची खास ऑफर; OnePlus च्या 'या' स्मार्टफोन खरेदीवर मिळतील 6000 रुपयांचे Benefits
यावेळीही जिओने ग्राहकांसाठी खास ऑफर सादर केली आहे. वनप्लस च्या 'या' स्मार्टफोन खरेदीवर युजर्संना 6000 रुपयांचे बेनिफिट्स मिळणार आहेत.
स्मार्टफोन कंपन्यांसोबत संलग्न होत रिलायन्स जिओ (Reliance Jio) सातत्याने नवनव्या ऑफर्स सादर करत असते. यावेळीही जिओने ग्राहकांसाठी खास ऑफर सादर केली आहे. वनप्लस (Oneplus) च्या काही स्मार्टफोन खरेदीवर ग्राहकांना 6000 रुपये किंमतीचे रिचार्ज बेनिफिट्स (Recharge Benefits) मिळणार आहेत. यात वनप्लस नॉर्ड सीई (OnePlus Nord CE), वनप्लस 8 (OnePlus 8) आणि वनप्लस 8 प्रो (OnePlus 8 Pro) या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. जाणून घेऊया या ऑफरविषयी सविस्तर... (Reliance Jio ने सादर केले '5' नवीन प्रीपेड प्लॅन्स; येथे पहा डिटेल्स)
काय आहे ऑफर?
या ऑफर अंतर्गत वनप्लस नॉर्ड सीई स्मार्टफोन खरेदी केल्यास 99 रुपयांचा प्लॅन मध्ये जिओ ग्राहकांना 40 महिन्यांपर्यंत 40 कूपन मिळणार आहेत. प्रत्येक कूपन व्हाऊचर 150 रुपयांचे असेल. याप्रमाणे 40 महिन्यांत एकूण 6 हजार रुपयांचे व्हाऊचर्स मिळतील. यातील रक्कम MyJio अॅपमध्ये क्रेडीट होईल. तसंच 31 मे 2030 पर्यंत हे व्हॅलिट असतील.
रिलायन्स जिओच्या प्रीपेड प्लॅन्स खरेदी करताा युजर्स या 150 रुपयांच्या कूपन्सचा वापर करु शकतात. 12 जून 2021 नंतर OnePlus Nord CE 5G खरेदी करणाऱ्या युजर्संना या ऑफरचा लाभ घेता येईल. तसंच रिलायन्स जिओच्या प्रीपेड सर्व्हिसेसचे अॅक्टीव्ह युजर्स आणि जिओ प्राईम मेंबर्स याचा लाभ घेऊ शकता.
18 मे 2020 नंतर खरेदी केलेल्या वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रो च्या ग्राहकांना 6 हजार रुपयांचे बेनिफिट्स मिळतील. यासाठी ते युजर्स जिओचे ग्राहक असणे गरजेचे आहे. फोन खरेदीवर एकूण 150 रुपयांचे 40 कूपन्स ग्राहकांना मिळणार असून या कुपन्सची व्हॅलिडीटी 31 मे 2023 पर्यंत असणार आहे. हे कूपन्स वापरुन तुम्ही त्या डिव्हाईसवर जिओचे रिचार्ज करु शकता. या डिव्हाईसच्या भारतीय व्हर्जनवरच ही ऑफर लागू राहणार आहे.