रिलायन्स जिओचा नवा 'Work From Home Pack'; दररोज मिळणार 2 GB डेटा

या परिस्थितीत रिलायन्स जिओने वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी खास प्लॅन लॉन्च केला आहे.

Reliance Jio (Photo Credit-Wikimedia Commons)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) देशभरात आपले प्रस्थ वाढवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून अनेक खाजगी कंपन्यांमध्ये 'वर्क फ्रॉम होम'ची मुभा देण्यात आली आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) सातत्याने आपल्या ग्राहकांसाठी तसंच नवी ग्राहक आकर्षित करण्यासाठी नवेनवे प्लॅन्स सादर करत असते. याही परिस्थितीत रिलायन्स जिओने वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी खास प्लॅन लॉन्च केला आहे. घरी बसून काम करणाऱ्या युजर्ससाठी रिलायन्स जिओने खास प्लॅन सादर करुन खुशखबर दिली आहे. 251 रुपयांचा हा प्लॅन असून याला 'Work From Home Pack' असे नाव देण्यात आले आहे.

या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना दर दिवशी 2 जीबी डेटा देण्यात येईल. 2 जीबीची मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड कमी होईल. म्हणजेच 64 kbps या स्पीडने इंटरनेटचा लाभ युजर्स घेऊ शकतील. या पॅकची 51 दिवसांची व्हॅलिटीडी आहे. मात्र या पॅकमध्ये व्हॉईल कॉल आणि एसएमएस ची सुविधा देण्यात आलेली नाही. (खुशखबर! BSNL चा 'वर्क फ्रॉम होम' करणा-यांसाठी आणला मोफत डेटा प्लान, रोज मिळणार 5GB डेटा)

यापूर्वी रिलायन्स जिओने काही निवडक डेटा व्हाऊचर प्लॅन अपग्रेड केले होते. यात युजर्संना अधिक डेटा आणि दुसऱ्या नेटवर्कवर फ्री व्हॉईस कॉलची सुविधा मिळत होती. याशिवाय 4 जी जिओ प्रीपेड डेटा व्हाऊचर्स आता 11, 21, 51 आणि 101 रुपयांत उपलब्ध होते. यात अनुक्रमे 800MB, 2GB, 6GB आणि 12GB हाय स्पीड डेटा मिळत आहे. याशिवाय नॉन-जिओ नेटवर्कवर अनुक्रमे 75, 200, 500 आणि 1000 मिनिटांचे फ्री कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.