Redmi Note 10S स्मार्टफोनचा Cosmic Purple कलर वेरिएंट भारतात लॉन्च; पहा फिचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
रेडमी नोट 10 एस आता Shadow Black, Frost White आणि Deep Sea Blue मध्ये उपलब्ध आहे.
शाओमी इंडिया (Xiaomi India) च्या रेडमी नोट 10 (Redmi Note 10) सिरीज ने नवा कॉसमिक पर्पल (Cosmic Purple) वेरिएंट अॅड केला आहे. रेडमी नोट 10 एस (Redmi Note 10S) यापूर्वी Shadow Black, Frost White आणि Deep Sea Blue या तीन रंगात उपलब्ध होता. आता त्यामध्ये कॉसमिक पर्पल हा चौथा रंग अॅड झाला आहे. हा स्मार्टफोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे- 6जीबी+64जीबी आणि 6जीबी+128जीबी. आता देशात फोनचा सेल सुरु झाला आहे. याच्या 6जीबी+64जीबी वेरिएंटची किंमत 14,999 रुपये इतकी असून 6जीबी+128जीबी वेरिएंटची किंमत 15,999 रुपये इतकी आहे. इच्छुक Mi India आणि Amazon.in च्या अधिकृत वेबसाईटवरुन हा स्मार्टफोन खरेदी करु शकतील.
लॉन्च ऑफर अंतर्गत या स्मार्टफोनवर एचडीएफसी ग्राहकांना 1000 रुपयांचा इन्टंट डिस्काऊंट दिला जात आहे. मोव्हिविक अॅपने पेमेंट केल्यास तुम्हाला 400 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. या मोबाईलच्या 6 जीबी + 128 जीबी वेरिएंटची शिपिंग प्रोसेस 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. (Redmi Note 10S चे फिचर्स आले समोर, Amazon वर झाला लाईव)
द रेडमी नोट 10 एस कॉसमिक पर्पल कलर वेरिएंटमध्ये पूर्वीच्या नोट 10एस सारखेच फिचर्स आहेत. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 11 वर आधारित MIUI 12.5 वर काम करतो. यात 6.43 FHD+ AMOLED डिस्प्ले 1080x2400 पिक्सल रेजोल्यूशन सह देण्यात आला आहे. यामध्ये octa-core MediaTek Helio G95 प्रोसेसर देण्यात आला आहे. या मोबाईल 6जीबी रॅम आणि 128जीबी पर्यंतचा स्टोरेज देण्यात आला आहे.