Realme Narzo 20 सीरीज भारतात झाले लाँच, 'या' दिवशी होणार पहिला सेल

जाणून घेऊयात भारतात लाँच झालेल्या या Realme Narzo 20 ची सीरिज वैशिष्ट्ये:

Realme Narzo 20 (Photo Credits: Twitter/Realme)

स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme च्या नव्या स्मार्टफोनची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती तो Realme Narzo 20 Series स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाला आहे. यात Realme Narzo 20, Realme Narzo 20 Pro आणि Realme Narzo 20A भारतात लाँच केले आहेत. यात Realme Narzo 20 मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आणि 4GB+128GB स्टोरेज अशा दोन प्रकारांत लाँच केले आहे. या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 10,499 आणि 11,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर Narzo 20A मध्ये 3GB+32GB स्टोरेज आणि 4GB+64GB स्टोरेज या वेरियंटमध्ये लाँच केले आहे. याची किंमत अनुक्रमे 8,499 रुपये आणि 9,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Narzo 20 Pro चा पहिला सेल 25 सप्टेंबरला, Narzo 20 चा 28 सप्टेंबरला तर Narzo 20A चा 30 सप्टेंबरला ठेवण्यात आला आहे. जाणून घेऊयात भारतात लाँच झालेल्या या Realme Narzo 20 ची सीरिज वैशिष्ट्ये:

Realme Narzo 20 Pro:

प्रकार-6GB+64GB= 14,999 रुपये

8GB+128GB= 16,999 रुपये

पहिला सेल- 25 सप्टेंबर

डिस्प्ले- 6.5 फुल एचडी

प्रोसेसर- MediaTek Helio G95

कॅमेरा- 48MP+8MP+2MP+2MP

बॅटरी- 4500mAh (65W फास्ट चार्ज सपोर्टसह)

हेदेखील वाचा- Realme Narzo 10 आणि Narzo 10A भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि धमाकेदार फिचर्स

Realme Narzo 20:

प्रकार- 4GB+64GB=10,499 रुपये

4GB+128GB= 11, 999 रुपये

पहिला सेल- 28 सप्टेंबर

डिस्प्ले- 6.5 फुल एचडी+ कॉर्निंग गोरिला ग्लास

प्रोसेसर- MediaTek Helio G85 SoC चिपसेट

कॅमेरा-48MP+8MP+2MP+8MP

बॅटरी- 6000mAh (18W फास्ट चार्ज सपोर्ट)

Realme Narzo 20A:

प्रकार- 3GB+32GB=8,499 रुपये

4GB+64GB=9,499 रुपये

पहिला सेल- 30 सप्टेंबर

डिस्प्ले- 6.5 इंचाची LCD

प्रोसेसर- क्वॉलकॉम Snapdragon 665 चिपसेट

कॅमेरा- 12MP+2MP+2MP+8MP

बॅटरी- 5000mAh (10W फास्ट चार्ज सपोर्ट)

थोडक्यात Narzo सीरिजचे हे तीनही स्मार्टफोन्स स्वत:चे फार खास आहेत. त्यामुळे त्यांची वैशिष्ट्ये देखील तितकीच वेगळी आणि आकर्षक आहेत.