Realme 8 च्या किंमतीत झाली घट, 64MP कॅमेरा असलेल्या या स्मार्टफोनची 'ही' आहे नवी किंमत

या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 14,999 रुपये इतकी होती. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 500 रुपयांनी कमी केली आहे. आता या स्मार्टफोनची किंमत 14,499 रुपये इतकी आहे. तर 6GB RAM + 128GB वेरियंटची किंमत 15,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Realme 8 5G (Photo Credits-Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमी ने Realme 8 च्या किंमतीत घट केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या अनेक स्मार्टफोन्सच्या किंमतीत कंपनीने घट केली आहे. Realme 8 स्मार्टफोन तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग साइट Flipkart आणि कंपनीच्या अधिकृत स्टोरवर खरेदी करता येईल. या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 14,999 रुपये इतकी होती. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 500 रुपयांनी कमी केली आहे. आता या स्मार्टफोनची किंमत 14,499 रुपये इतकी आहे. तर 6GB RAM + 128GB वेरियंटची किंमत 15,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Realme 8 च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. ज्याचे रेजॉल्यूशन 2400/1080 पिक्सल आहे. फोनचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. याचा स्क्रिन टू बॉडी रेश्यो 90.5 टक्के आहे. तसेच पीक ब्राइटनेस 600nits आहे. प्रोसेसरसाठी फोनमध्ये Demensity 700 5G चा वापर केला आहे. जो 7nm प्रोसेससर सह येणार आहे.हेदेखील वाचा- Realme Narzo 30 'या' तारखेला लॉन्च होण्याची शक्यता; पहा काय असेल खासियत आणि किंमत

कंपनीने असा दावा केला आहे की, रिअलमी 8 5 जी भारतातील पहिला असा 5 जी फोन आहे जो Demensity 700 चिपसेटवर काम करणार आहे. यामध्ये पॉवरफुल ARM Mali G57 सपोर्ट मिळणार आहे. फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये वर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळणार आहे. ज्याच्या मदतीने 4GB रॅम हा 5GB आणि 8GB रॅम 11GB रॅममध्ये कन्वर्ट करता येऊ शकणार आहे. हा अॅन्ड्रॉइड 11 आधारित Realme UI 2.0 वर काम करणार आहे

रिअलमीच्या या स्मार्टफोनमच्या रियर पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलसह B&W कॅमेरा आणि एक मॅक्रो लेन्सचा सपोर्ट मिळणार आहे. फोन 5 नाइट स्केप फिल्टरसह येणार आहे. फ्रंटला 16MP चा कॅमेरा दिला जाणार आहे. फोनला साइड माउंडेट फिंगरप्रिंट स्कॅनर दिला गेला आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. जी 18W फास्ट चार्जरच्या मदतीने चार्ज करता येणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now