Reader's Digest Shutting Down: रीडर्स डायजेस्ट मासिकाचे 86 वर्षांनंतर यूकेमधील कामकाज बंद केले, 500 कर्मचाऱ्यांना कर्मताऱ्यांना गमावल्या नोकऱ्या

रीडर्स डायजेस्टने 86 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर युकेमधील त्यांचे कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी रीडर्स डायजेस्ट मधील 500 कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

Reader's Digest UK Logo (Photo Credit: Official UK Website)

Reader's Digest Shutting Down: युनायटेड किंगडममध्ये तब्बल 86 वर्षांपासून कार्यरत असलेले मासिक रीडर्स डायजेस्ट(Reader's Digest) या कंपनीने त्यांचे कामकाज बंद(Shutting Down)करण्याची घोषणा केली आहे. आरोग्य, सत्य कथा, मते, तथ्ये, काल्पनिक कथा आणि अनेक गोष्टींची माहिती आपल्या लेखांच्या माध्यमातून वाचकांना वर्षानुवर्षे कंपनी देत होती. रीडर्स डायजेस्टच्या मुख्य संपादक इवा मॅकेविक यांनी याबद्दल माहिती दिली.3 मे रोजी त्यांनी अधिकृत UK वेबसाइटवर 'End of an Era: Thank You for the Memories' या शीर्षकासह पोस्ट शेअर केली. (हेही वाचा: Google Layoff: गुगलमध्ये पुन्हा कर्मचारी कपात, कोअर टीममधील 200 कर्मचाऱ्यांना काढले; भारत आणि मेक्सिकोमध्ये संबंधित पदे भरण्याची योजना) 

पोस्टच्या माध्यमातून त्यांनी जाहीर केले की रीडर्स डायजेस्ट यूके 86 वर्षांच्या ऑपरेशननंतर यूकेमध्ये बंद केले जात आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, लिंक्डइनवरही याची घोषणा करताना इवा मॅकेविक यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, आठ वर्षे प्रकाशनासाठी योगदान देणे हे आनंददायी होते. सहा जणांच्या टीमसोबत हे कामकाज सुरू होते.

रीडर्स डायजेस्ट का बंद होत आहे?

अहवालानुसार, ईवा मॅकेविक यांनी उघड केले की रीडर्स डायजेस्ट बंद होण्यामागील कारण म्हणजे आर्थिक दबाव.आर्थिकरित्या दुर्बल असल्याने हे बंद करावे लागत आहे. The Layoffs Trackers (@WhatLayoffs) द्वारे X वरील पोस्टनुसार, 500 कर्मचारी कायमस्वरूपी प्रभावित झाले आहे.

रीडर्स डायजेस्ट इतिहास, तपशील आणि शेवटचा संदेश

1922 मध्ये अमेरिकन सामान्य हितसंबंधित कौटुंबिक मासिक म्हणून स्थापित झालेले रीडर्स डायजेस्टने 1938 मध्ये आपल्या पहिल्या प्रकाशनाद्वारे यूकेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पुढे विविध विषयांवर लेख प्रकाशीत करण्यात आले, जसे की पाककृती, आरोग्य मते, आर्थिक सल्ला इ. कंपनीला परवाना मिळाला होता. यूएस मधील त्याच्या मूळ कंपनीद्वारे म्हणजेच ट्रस्टेड मीडिया ब्रँड्स, पूर्वी रीडर्स डायजेस्ट असोसिएशन, इंक यांच्या मदतीने यूकेमध्ये मासिके प्रकाशित करत होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now