RCOM- Jio Deal: रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून स्पेक्ट्रम खरेदी न झाल्यास महराष्ट्रासह अन्य 7 राज्यात जिओच्या सेवेला फटका बसणार
रिलायंस जियो (Reliance Jio) इंफोकॉमने रिलायंस कम्युनिकेशन्सकडून (Reliance Communication) स्पेक्ट्रम खरेदी केले नाही, आणि अनिल अंबानीची कंपनी दिवाळखोरीत गेल्यास दिल्ली, महाराष्ट्र,पश्चिम बंगालच्या सबस्क्रायबर्सना त्याचा मोठा फटका बसू शकतो.
RCOM Jio Deal: रिलायंस जियो (Reliance Jio) इंफोकॉमने रिलायंस कम्युनिकेशन्सकडून (Reliance Communication) स्पेक्ट्रम खरेदी केले नाही, आणि अनिल अंबानीची कंपनी दिवाळखोरीत गेल्यास दिल्ली, महाराष्ट्र,पश्चिम बंगालच्या सबस्क्रायबर्सना त्याचा मोठा फटका बसू शकतो. महाराष्ट्रासह देशातील सात अन्य राज्यांमध्ये हा फटका बसू शकतो. टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये जिओची एन्ट्री झाल्यापासून सारीच गणितं बदलली आहेत. स्वस्त दरातील कॉलिंग आणि इंटरनेट सेवा यामुळे ग्राहकांमध्ये रिलायंस जिओची क्रेझ आहे.
दूरसंचार विभागाने आरकॉम -जिओ स्पेक्ट्रम ट्रेडिंग डिलला मंजुरी देण्यासाठी नकार दिला होता. दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार हे डील सरकारी नियमांना धरून झालेले नाही.
काही राज्यात 800 मेगाहर्ट्ज बँड पाच युनिट्सवर अवलंबून आहेत. स्पेक्ट्रम ब्लॉकसाठी जिओ आरकॉमवर अवलंबून आहे. हा बँड 4G LTE सेवेसाठी खूप महत्त्वाचा आहे. यातून प्रत्येक सर्कलमध्ये जिओकडे 800 मेगाहर्ट्झ बँडमध्ये 4G एअरवेव्सच्या 3.8 युनिट्स आहेत. या बँडमध्ये एलटीई कव्हरेजसाठी आरकॉमच्या स्पेक्ट्रमवर अवलंबून आहे.