Raksha Bandhan 2021: रक्षाबंधन निमित्त बहिणीला गिफ्ट देण्यासाठी टॉप '4' गॅजेट्स!

त्यामुळे बहिणीला इतर गिफ्ट ऐवजी टेक गॅजेट तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. यासाठी स्मार्टफोन्स, इअर बर्ड्स, स्मार्ट स्पीकर्स आणि स्मार्ट वॉचेस यांसारखे विविध पर्याय उपलब्ध आहेत.

Top 4 Gadgets To Gift Your Sister This Rakhi (File Photo)

यंदा रविवार, 22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण साजरा होणार आहे. बहिण-भावाच्या पवित्र नात्याची जपणूक करण्यासाठी हा दिवस अत्यंत खास आहे. या दिवशी बहिण भावाची ओवाळणी करुन राखी बांधते. त्याबदल्यात भाऊ बहिणीला छानसं गिफ्ट ओवाळणी म्हणून देतो. सध्याचं युग डिजिटल आहे. त्यामुळे बहिणीला इतर गिफ्ट ऐवजी टेक गॅजेट (Tech Gadgets) तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. यासाठी स्मार्टफोन्स, इअर बर्ड्स, स्मार्ट स्पीकर्स आणि स्मार्ट वॉचेस यांसारखे विविध पर्याय उपलब्ध आहेत. यातील काही खास पर्याय तुमच्या समोर सादर करत आहोत. पाहुया कोणते आहेत ते...

फिटनेस बँड्स:

जर तुमची बहिण फिटनेस लव्हर असेल तर तुम्ही तिला फिटनेस बँड गिफ्ट करु शकता. एमआय बँड 5 हा सध्या फ्लिपकार्ट सेलमध्ये 2499 रुपयांना उपलब्ध आहे. तसंच रियलमी वॉच 2 फ्लिपकार्टवर 3499 रुपयांना उपलब्ध आहे. वनप्लस बँड 3299 रुपयांना वनप्लसच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. Huawei बँड 6 तुम्हाला अॅमेझॉनवर 3990 रुपयांना मिळेल.

स्मार्टफोन्स:

बहिणीला स्मार्टफोनची गरज असल्यास तर काही खास, अफॉर्डेबल स्मार्टफोन्स तुम्ही तिला गिफ्ट करु शकता. रियलमी 8 चा 6जीबी+128जीबी वेरिएंट तुम्हाला 15,999 रुपयांना तर 8जीबी+128जीबी वेरिएंट 16,999 रुपयांना मिळेल. पोको एम3 चा 4जीबी+64जीबी वेरिएंट 13,999 रुपयांना तर 6जीबी+128जीबी वेरिएंट 15,999 रुपयांना मिळेल. वनप्लस नॉर्ड सीई 5जी फोनचा 6जीबी+128जीबी वेरिएंट 22,999 रुपयांना तर 8जीबी+128जीबी वेरिएंट 24,999 रुपयांना मिळेल. सॅमसंग गॅलेक्सी एम 42 5जी चा 6जीबी+128जीबी वेरिएंट 21,999 रुपयांना तर 8जीबी+128जीबी वेरिएंट 22,999 रुपयांना मिळेल. (Smartphone Gift For Raksha Bandhan: रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला गिफ्ट देण्यासाठी निवडा 'हे' 10 हजारांपेक्षा कमी किंमतीतले बजेट स्मार्टफोन)

ईअर बर्ड्स:

तुमच्या बहिणीला जर गाण्यांची आवड असेल तर ईअर बर्ड्स देऊन तुम्ही तिचे रक्षाबंधन खास करु शकता. OnePlus Buds Z ईअर बर्ड्स 2999 रुपयांना अॅमेझॉनवर उपलब्ध आहेत.  Realme Buds Air 2 3,299 रुपयांना उपलब्ध आहेत. यासोबत Redmi Earbuds 2C 1,498 रुपयांत उपलब्ध आहेत.

 स्मार्टस्पीकर्स:

स्मार्टस्पीकर्स सारखे गॅजेट देऊन सुद्धा तुम्ही तुमच्या बहिणीचे रक्षाबंधन खास करु शकता. अॅमेझॉनचा थर्ड जनरेशन Echo Dot स्पीकर 2,999 रुपयांना अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. बोटचा Stone 201A हा स्मार्टस्पीकर 1599 रुपयांना उपलब्ध आहे. यासोबत Zebronics चा Zeb-Smart Bot 2999 तर एमआयचा Outdoor Bluetooth Speaker 1499 रुपयांना उपलब्ध आहे.

यापैकी तुमच्या बहिणीच्या आवडीचे आणि तुमच्या बजेटमधील गिफ्ट देऊन यंदाची राखी पौर्णिमा खास करा.