Chandrayaan-3: 'शिवशक्ती पॉइंट'जवळ रहस्यांच्या शोधात फिरत आहे Pragyan Rover; ISRO ने शेअर केला व्हिडिओ, Watch

तसेच 23 ऑगस्ट आता दरवर्षी राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याचंही पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं.

Pragyan Rover (PC - Twitter/ISRO)

Chandrayaan-3: चांद्रयान-3 मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवलेले प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) ‘शिवशक्ती’ बिंदूभोवती (Shiva Shakti Point) फिरताना दिसत आहे. भारतीय अंतराळ संस्था ISRO ने रोव्हरचा एक नवीन व्हिडिओ जारी केला आहे. इस्रोने शनिवारी जारी केलेल्या नवीन व्हिडिओमध्ये, चांद्रयान-3 चा प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर पडताना आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरताना दिसत आहे.

व्हिडीओ जारी करताना इस्रोने लिहिले की, दक्षिण ध्रुवावरील चंद्राच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी प्रज्ञान रोव्हर शिवशक्ती पॉईंटभोवती फिरत आहे. इस्रोने जारी केलेला व्हिडिओ 40 सेकंदांचा आहे. दरम्यान, पीएम नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तीन मोठ्या घोषणा केल्या. ते म्हणाले की, चांद्रयान-3 ज्या ठिकाणी उतरले ते 'शिवशक्ती' पॉईंट म्हणून ओळखले जाईल, तर चांद्रयान-2 ज्या ठिकाणी उतरले ते 'तिरंगा' पॉइंट म्हणून ओळखले जाईल. तसेच 23 ऑगस्ट आता दरवर्षी राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याचंही पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा - Chandrayaan 3 Special Google Doodle: चंद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेनंतर गुगलने खास डूडल शेअर करत केलं भारताचं अभिनंदन!)

तथापी, चंद्रयान-3 च्या चंद्रावरील टचडाउन पॉइंटला पंतप्रधान मोदींनी 'शिवशक्ती' पॉइंट म्हणून नाव दिल्यावर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीद अल्वी यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, हे नाव हास्यास्पद आहे. कारण पंतप्रधान मोदींना चंद्राच्या पृष्ठभागाला नाव देण्याचा अधिकार नाही. सारे जग यावर हसेल. चंद्रावर एका बिंदूचे नाव ठेवण्याचा अधिकार पंतप्रधान मोदींना कोणी दिला? असा सवालही त्यांनी केला आहे.