लोकप्रिय Google डूडल गेम 'हिप हॉप': popular Google Doodle Games सीरिज मध्ये आज गूगलने दिली घरबसल्या Hip hop म्युजिक बनवायची संधी!

'Hip Hop'हे इंटरॅक्टिव्ह डूडल 2017 साली Hip Hop music ला मानवंदना म्हणून गूगलने लॉन्च केलं होत आज त्याचा पुन्हा युजर्सना गूगल डूडल गेम सीरीजमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Hip Hop google doodle (Photo Credits: Google)

आज Popular Google Doodle Games सीरिज मध्ये गूगलने तुम्हांला घरबसल्या डीजे बनण्याची संधी दिली आहे. एकीकडे लॉकडाऊनचे दिवस वाढत आहे. त्यामध्ये आता होम क्वारंटीनचा हा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न जर तुम्हांला पडला असेल तर तुमच्या मदतील गूगल डूडल गेमची सीरीज आहे. आज गूगल डुडल गेममध्ये घरात बसून हिप हॉप म्युझिक बनवण्याची संधी तुमच्यासाठी चालून आली आहे. 'Hip Hop'हे इंटरॅक्टिव्ह डूडल 2017 साली Hip Hop Music ला मानवंदना म्हणून गूगलने लॉन्च केलं होत आज त्याचा पुन्हा युजर्सना गूगल डूडल गेम सीरीजमध्ये समावेश करण्यात आला आहे. Popular Google Doodle Games: गुगल आज घेऊन आलय Rockmore चं म्युझिकल डुडल; घरी बसल्या असा खेळा हा मजेदार खेळ

आज गूगल डूडलच्या फीचरमध्ये दोन turntables दिले आहेत. यामध्ये लोकप्रिय गाण्यांचे ट्रॅक्स मिक्स करून Hip Hop संगीताचा आनंद घेत त्याचा वारसा जपण्याची संधी आहे. अमेरिकेमध्ये हा लोकप्रिय स्ट्रीट डान्सचा प्रकार आहे. सध्या गूगलकडून जगभरातील नागरिकांना घरीच रहा सुरक्षित रहा असा संदेश दिला जात आहे. त्यामुळे त्याच्या क्वारंटीन काळात घरातील लोकांसोबत, मित्रमंडळींसोबत वेळ घालवता यावा यासाठी हा खास पर्याय गूगल कडून देण्यात आले आहेत. दरम्यान गूगल्ने ' हिप हॉप'चं हे गूगल डूडल 'हिप हॉप' संगीताच्या 44 व्या वर्षपूर्तीसाठी खास बनवलं होतं. Fab 5 Freddy या हिप हॉप होस्टच्या पहिल्या जगात धुमाकूळ घालणार्‍या hip-hop music व्हिडिओ शोला फीचर करणारं आहे. त्याची माहिती देखील यामधून दिली जात आहे.

कसा खेळाल?

डूडलवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तो तुम्हंला एका डिजे बुथमध्ये घेऊन जाईल. तिथे दोन turntables असतील. त्यानंतर गाण्यांच्या कलेक्शनमधून तुम्हांला दोन रेकॉर्ड्स निवडायच्या आहेत. कर्सरचा वापर करून तुम्ही गाण्याचा रिधम, टेम्पो, बीट्सवर बदल करू शकता. आवाज कमी जास्त करण्यासाठी देखिल फेडर आहे. एका बाजूला गाण्याचा स्पीड कमी-जास्त करण्याची सोय आहे. तर वरच्या बाजूला असणारी ट्रॉफी तुम्हांला सांगेल तुम्ही लेव्हल अन्लॉक करण्यामध्ये यशस्वी झाले आहात की नाही. तुम्ही पास झाला असाल तर नवा ट्र्क मिळेल.

दरम्यान, युजर्ससाठी लॉकडाउनमध्ये गुगल 10 जुन्या खेळांची सीरीज घेऊन येणार आहे. यापूर्वी कोविड योद्धांना सलाम करण्यासाठी आणि कोरोना व्हायरस बाबत जनजागृती करण्यासाठी खास सीरीज गुगल डुडलच्या माध्यमातून सादर केली होती.