Poco M2 Pro चा ऑनलाईन सेल आज दुपारी 12 पासून Flipkart वर सुरु; जाणून घ्या किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
या स्मार्टफोनचा आज सेल असून दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर या सेलला सुरुवात होईल.
Poco India ने आपला दुसरा स्मार्टफोन Poco M2 Pro हा या महिन्याच्या सुरुवातीला भारतात लॉन्च केला. या स्मार्टफोनचा आज सेल असून दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर या सेलला सुरुवात होईल. त्यामुळे तुम्हाला जर हा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर या सेलचा तुम्ही लाभ घेऊ शकता. हा स्मार्टफोन तीन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे- 4GB + 64GB, 6GB + 64GB & 6GB + 128GB. मात्र हे सर्व वेरिएंट सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतीलच असे कंपनीकडून सांगण्यात आलेले नाही.
Poco M2 Pro स्मार्टफोनच्या 4GB + 64GB वेरिएंटची किंमत 13,999 रुपये इतकी असून 6GB RAM + 64GB वेरिएंटची किंमत 14,999 रुपये इतकी आहे. तर या स्मार्टफोनचे टॉप वेरिएंट 6GB + 128GB हे 16,999 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध आहे- ऑऊट ऑफ द ब्लू (Out of the Blue), ग्रीन आणि ग्रीनर (Green and Greener), ब्लॅकच्या दोन शेड्स (Two Shades of Black).
किंमत:
4GB + 64GB | 13,999 रुपये |
6GB RAM + 64GB | 14,999 रुपये |
6GB + 128GB | 16,999 रुपये |
POCO For India Tweet:
स्पेसिफिकेशन्स:
प्रोसेसर | Snapdragon 720G |
रॅम | 4GB, 6GB |
इंटरनल स्टोरेज (मेमरी) | 64GB, 128GB |
बॅटरी | 5020 mAh |
बॅक कॅमेरा | 48MP, 8MP, 2MP, 2MP, |
सेल्फी कॅमेरा | 16MP |
चार्जिंग सपोर्ट | 33W फास्ट चार्गिंग सपोर्ट |
या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा IPS LCD FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तर Snapdragon 720G या प्रोसेसरवर हा फोन कार्यरत आहे. तसंच यात 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर सह 6GB रॅम आणि 128 जीबी मेमरी देण्यात आली आहे. या पोको स्मार्टफोनमध्ये अॅनरॉईड 10 वर आधारित असलेला MIUI 11 आणि Poco Launcher 2.0 देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये 48MP चा प्रायमरी शूटर कॅमेरा दिला असून 8MP अल्ट्रा व्हाईड एन्गल लेन्स देण्यात आला आहे. त्याचबरोबर 2MP चा मॉक्रो कॅमेरा आणि डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसंच Poco M2 Pro मध्ये 5020 mAh बॅटरी असून 33W चा फास्ट चार्जिंग सपोर्टही देण्यात आला आहे. तसंच बायोमेट्रीक व्हेरिफिकेशनसाठी पॉवर की वर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.