सावधान! POCO F3 GT खरेदी पूर्वी जाणून घ्या फोनसंबंधित 'या' महत्वाच्या गोष्टी

कारण पोको एफ3 जीटी स्मार्टफोनमध्ये हिटिंगच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

poco (Pic Credit - poco)

जर तुम्ही पोको एफ3 जीटी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण पोको एफ3 जीटी स्मार्टफोनमध्ये हिटिंगच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांनी सोशल मीडियात कंपनीला याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले की, गेमिंगच्या दरम्यानसह चार्जिंगवेळी पोको एफ3 जीटी मध्ये हिटिंगची समस्या येत आहे. तर पोको एफ3 जीटी स्मार्टफोन गेल्याच महिन्यात भारतात लॉन्च करण्यात आला होता. हा Redmi K40 गेमिंग अॅडिशनचा री-ब्रांडेड वर्जन आहे. त्यामुळे या वर्षाच्या एप्रिल महिन्यात ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिला होता. फोन फिजिटिल ट्रिगर बटण आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे.

कंपनीने ग्लोबल पोको कम्युनिटी फोरमवर एक पोस्ट टाकत त्यांनी हिटिंगच्या समस्येवर उत्तर दिले आहे. त्यांनी असे म्हटले की, स्मार्टफोनमध्ये हिटिंगची समस्या उद्भवत आहे. परंतु ही समस्या काहीच स्मार्टफोनमध्ये आहे. ज्या फोनमध्ये MIUI 12.5.4.0RKJINXM सॉफ्टवेअर वर्जन आहे. हे अपडेच फोनच्या लॉन्चिंग नंतर जाहीर करण्यात आले होते.(Samsung Exynos W920: सॅमसंगकडून 'या' नवीन प्रोसेसरची घोषणा, जाणुन घ्या कसा आहे हा प्रोसेसर)

POCO F3 GT स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 29,999 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनसाठी ग्राहकांना 28,999 रुपये मोजावे लागत आहेत. तसेच 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरियंटची किंमत 30,999 रुपये आहे.

POCO F3 GT  मध्ये 6.67  इंचाचा एमोलेड डिस्प्ले दिला गेला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे.तर टच सॅपलिंग रेट 480Hz आहे. फोन MediaTek Dimensity 1200 चिपसेट सपोर्टसह येणार आहे. फोनच्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा मुख्य कॅमेरा 64MP चा आहे. तर फ्रंट कॅमेरा 16MP चा असणार आहे. पोको एफ3 जीटी  स्मार्टफोनमध्ये 5065mAh ची बॅटरी दिली आहे.