Poco F3 GT भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत
या स्मार्टफोनमध्ये दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. यात टॉप-एंड परफॉर्मन्ससाठी .
स्मार्टफोन ब्रँड पोको ने भारतात नवा स्मार्टफोन पोको एफ3 जीटी लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. यात टॉप-एंड परफॉर्मन्ससाठी स्मार्टफोन ब्रँड पोको ने भारतात नवा स्मार्टफोन पोको एफ3 जीटी लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. यात टॉप-एंड परफॉर्मन्ससाठी Dimension 1200 Chipset प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन तीन स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे- 6जीबी+128जीबी, 8जीबी+128जीबी आणि 8जीबी+256जीबी. यांची किंमत अनुक्रमे 25,999 रुपये, 27,999 रुपये आणि 29,999 रुपये इतकी आहे.
हा स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध आहे- गनमेटल सिल्वर (Gunmetal Silver) आणि प्रीडेटर ब्लॅक (Predator Black). हा स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस रिजोल्यूशन, 120HZ रिफ्रेश रेट आणि एचडीआर10 प्लस सपोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रोटेक्शनसाठी मागे आणि पुढे कॉनिर्ंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आली आहे.
सेल्फी कॅमेऱ्यासाठी वरच्या बाजूला वॉटरड्रॉप नोच देण्यात आला आहे. पोको एफ3 जीटी मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाईड एंगल कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
पोको एफ3 जीटी मध्ये फ्लॅगशिप मीडियाटेक चिपसेट प्रोसेसर सह डायमेंशन 1200 चिपसेट देखील आहे. हा स्मार्टफोन 3.0 गीगाहट्स वर कार्यरत आहे. मल्टिटास्कींगसाठी हा फोन अतिशय उपयुक्त आहे. सिक्युरिटीसाठी यामध्ये फेस अनलॉक आणि इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5065 mAh ची बॅटरी दिली असून 67W चा फास्ट चार्गिंग सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच ड्युएल स्पिकर्स, ट्रिपल मायक्रोफोन आणि ड्युएल 5 जी सपोर्ट हे याचे काही खास फिचर्स आहेत.