Poco C31 स्मार्टफोन भारतात लॉन्च; पहा काय आहे किंमत, खासियत आणि Sale Date

मागील वर्षी लॉन्च झालेल्या पोको सी 3 चे हे अपग्रेडेट व्हर्जन आहे. हा स्मार्टफोन 2 ऑक्टोबर 2021 पासून फ्लिपकार्ट बिग बिलियन सेल अंतर्गत हा फोन खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Poco C31 (Photo Credits: Poco India)

पोको इंडियाने (Poco India) नवा स्मार्टफोन पोको सी 31 (Poco C31) देशात लॉन्च केला आहे. मागील वर्षी लॉन्च झालेल्या पोको सी 3 (Poco C3) चे हे अपग्रेडेट व्हर्जन आहे. हा स्मार्टफोन 2 ऑक्टोबर 2021 पासून फ्लिपकार्ट बिग बिलियन सेल (Flipkart Big Billion Days Sale) अंतर्गत हा फोन खरेदीसाठी उपलब्ध असेल. या स्मार्टफोनच्या 3GB+32GB वेरिएंटची किंमत 8,499 रुपये इतकी असून 4GB+64GB वेरिएंटची किंमत 9,499 रुपये इतकी आहे. मात्र सेल अंतर्गत याची किंमत अनुक्रमे 7,999 रुपये आणि 8,999 रुपये इतकी असेल. यावर लॉन्च ऑफरही सादर करण्यात आली आहे. अॅक्सिस बँक (Axis Bank) किंवा आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स (Credit & Debit Cards) वरुन खरेदी केल्यास यावर 10 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काऊंट दिला जात आहे.

Poco C31 हा स्मार्टफोन दोन शेड्समध्ये उपलब्ध होईल- Shadow Grey आणि Royal Blue. यात 5000mAh ची बॅटरी दिली असून standby time मोडवर हा मोबाईल यावर 540 तास चालू शकतो. तर व्हिडिओ प्लेबॅकवर 31 तास चालू शकतो.

या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यात Media Helio G35 SoC प्रोसेसर असून 4GB चा रॅम आणि 64GB चा इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. हा स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येईल.

Poco C31 Smartphone (Photo Credits: Poco)

POCO India Tweet:

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिला असून यात 13MP चा मेन कॅमेरा, 2MP चा मायक्रो लेन्स आणि 2MP चा डेप्थ शूटर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Poco C31 India Launch (Photo Credits: Flipkart)

Poco C31 या स्मार्टफोनमध्ये सिक्युरीटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर (Fingerprint Sensor) आणि फेस अनलॉक (Face Unlock) सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.