OnePlus Nord Official Launch Date: वनप्लस नॉर्ड 21 जुलै रोजी होणार लॉन्च; 15 जुलै पासून Amazon.in वर प्री-ऑर्डरला सुरुवात

21 जुलै रोजी हा स्मार्टफोन लॉन्च होणार असून याच्या प्री ऑर्डर्स 15 जुलै, 2020 पासून सुरु करण्यात येतील. हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियावरील ऑनलाईन सेलद्वारे विक्रीस उपलब्ध असेल.

OnePlus Nord Official Launch Date Confirmed For July 21 (Photo Credits: OnePlus India)

चायनीज ब्रँड वनप्लस (OnePlus) कंपनीने वनप्लस नॉर्डची (OnePlus Nord) लॉन्चिंग डेट जाहीर केली आहे. 21 जुलै रोजी हा स्मार्टफोन लॉन्च होणार असून याच्या प्री ऑर्डर्स 15 जुलै, 2020 पासून सुरु करण्यात येतील. हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियावरील (Amazon India) ऑनलाईन सेलद्वारे विक्रीस उपलब्ध असेल. त्यामुळे हा स्मार्टफोन विकत घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील आठवड्यात 499 रुपयांच्या टोकन अमाऊंटसह हा फोन बुक करु शकता.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वनप्लस नॉर्डचा लॉन्चिंग इव्हेंट 21 जुलै रोजी होणार असून कोविड-19 संकटामुळे व्हर्च्युअल लॉन्चिंग होणार आहे. OnePlus Nord AR द्वारे हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येईल. हे अॅप तुम्हाला गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल. वनप्लस नोट स्मार्टफोन सध्या बराच चर्चेत आहे आणि अॅमेझॉनवर कमिंग सून टॅगलाईनसह हा स्मार्टफोन दिसत आहे. या फोनची लॉन्च डेट अॅमेझॉनच्या एका बॅनरमुळे लिक झाली आहे.

OnePlus Nord Launch Date Confirmed (Photo Credits: OnePlus 

सुरुवातीच्या काळात माफक दरात चांगला स्मार्टफोन उपलब्ध करुन देण्यावर कंपनीचा भर होता. त्यानंतर या कंपनीच्या फोनच्या किंमती वाढत गेल्या. मात्र आता बऱ्याच काळानंतर हा स्वस्त स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आहे. वनप्लस नॉर्ड हा स्वस्तातला स्मार्टफोन 500 डॉलरपेक्षा कमी किंमती मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. या मोबाईलमध्ये मीड रेंज स्पेसिफिकेशन आणि फ्लॅगशीप लेव्हलचा कॅमेरा असणार आहे. वनप्लस नॉर्डची प्री ऑर्डर 31 ऑगस्टपर्यंत स्वीकारण्यात येईल. वनप्लस नॉर्डची प्री ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना वनप्लस कंपनीतर्फे एक गिफ्टबॉक्स पाठवण्यात येणार आहे. या गिफ्टबॉक्समध्ये वनप्लस बुलेट्स वायरलेस व्ही वन हेडफोन आणि एक फोन कव्हर मोफत देण्यात येणार आहे.

OnePlus Nord (Photo Credits: OnePlus India)

वनप्लस नॉर्ड हा स्मार्टफोन बराच चर्चेत असल्यामुळे या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल काही गोष्टी लिक झाल्या आहेत. या फोनमध्ये ऑक्टाकोर क्वॉलकॅम स्पॅनड्रगन 756 प्रोसेसर असणार आहे. तसंच या फोनमध्ये ट्रिपर रिअर कॅमेरा दिलेला असून ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या मोबाईलमधील प्रायमरी कॅमेरा हा ऑप्टीकल इमेज स्टेबलायजेशनला सपोर्ट करतो. या मोबाईलबद्दल अधिक माहिती लॉन्चिंग इव्हेंटमध्ये कळेल.