IPL Auction 2025 Live

OnePlus 10 Pro: प्रतीक्षा संपली! लवकरच बाजारात येणार 'वन प्लस 10 प्रो'; 2K डिस्प्ले, 32 MP सेल्फी कॅमेरासह मिळू शकतात 'हे' फीचर्स

OnePlus 10 Pro च्या फास्ट चार्जिंगबद्दल बोलायचे झाल्यास, यात 80W वायर फ्लॅश चार्ज मिळेल, तर 50W वायरलेस फ्लॅश चार्जर सपोर्ट उपलब्ध असेल

OnePlus- प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits-Twitter)

2021 हे वर्ष संपत आले आहे व लवकरच 2022 सुरू होईल. पण त्याआधीच पुढच्या वर्षी लॉन्च होणार्‍या डिव्हाइसची माहिती समोर येऊ लागली आहे. सर्वसाधारणपणे वन प्लस (OnePlus) दरवर्षी पहिल्या तिमाहीत आपली नवीन फ्लॅगशिप सिरीज लॉन्च करते. सध्या देशामध्ये OnePlus 10 सीरीजच्या फोनची आतुरतेने वाट वाट पाहत आहेत, कारण कंपनीने अजून OnePlus 9RT भारतात सादर केलेला नाही. पण OnePlus 10 Pro बद्दल माहिती समोर येऊ लागली आहे. OnePlus त्याची OnePlus 10 सिरीज पुढील वर्षी 2022 च्या सुरुवातीला लॉन्च करू शकते. या सीरीज अंतर्गत कंपनी OnePlus 10 आणि OnePlus 10 Pro स्मार्टफोन लॉन्च करू शकते.

अहवालानुसार, OnePlus 10 Pro ला 6.7-इंचाचा डिस्प्ले मिळेल, ज्यामध्ये 2K रिझोल्यूशन असेल. यात 120Hz चा रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळेल, जो गेमिंग आणि स्क्रोलिंगचा अनुभव अजून चांगला बनवेल. यात LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असेल, तर सुपर वाईड अँगल कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल आणि तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असेल, जो 3X झूम देईल. यात सेल्फीसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा दिला जाऊ शकतो. (हेही वाचा: Motorola चा स्वस्त 5G स्मार्टफोन G51 भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह ऑफर्स)

OnePlus 10 Pro च्या फास्ट चार्जिंगबद्दल बोलायचे झाल्यास, यात 80W वायर फ्लॅश चार्ज मिळेल, तर 50W वायरलेस फ्लॅश चार्जर सपोर्ट उपलब्ध असेल. तसेच, हा फोन ColorOS 12 सिस्टमवर काम करेल, जो Android आधारित आहे. OnePlus नेहमीच नवीनतम आणि फ्लॅगशिप प्रोसेसर वापरतो. यावेळी देखील कंपनी Qualcomm Snapdragon 8 Gen 1 वापरू शकते. यात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल.