Netflix ने लॉन्च केले ‘Play Something’ फिचर; युजर्सचा कल पाहून दाखवणार आवडीचे प्रोग्राम

Play Something असं या फिचरचं नाव असून ते युजर्संच्या नक्कीच पसंतीस पडेल.

Netflix logo (Photo credit: twitter)

स्ट्रिमिंग जाएंट (Streaming Giant) नेटफ्लिक्स (Netflix) ने नवे फिचर लॉन्च केले आहे. 'Play Something' असं या फिचरचं नाव असून ते युजर्संच्या नक्कीच पसंतीस पडेल. युजर्सचा कल पाहुन त्यांच्या आवडीचे प्रोग्राम दाखवण्याचे काम हे फिचर करणार आहे, अशी माहिती TechCrunch ने दिली आहे. या फिचरमुळे आता कोणताही रॅंडम कन्टेट प्ले होणार नाही. तर तुम्ही बघत असलेल्या सिनेमा किंवा वेबसिरीज शी निगडीत असलेले इतर सिनेमे किंवा शोज तुम्हाला समोर दिसतील.

त्याचबरोबर एखादा सिनेमा किंवा शो तुम्ही अर्धवट पाहिला असेल तर तो तुमच्या समोर येऊ शकतो. नेटफ्लिक्सच्या या नव्या अलोगोरिमद नुसार तुमच्या समोर एखादी ब्रँड न्यू सिरीज किंवा सिनेमा सुद्धा येऊ शकतो. (How to Make Account on Netflix: नेटफ्लिक्सवर स्वत:चे अकाउंट बनविण्यासाठी फॉलो करा 'या' स्टेप्स)

या फिचरचे गेल्या काही वर्षामध्ये वेगवेगळ्या नावाखाली टेस्टिंग सुरु होते. एका वर्षापूर्वी या फिचरला 'शफल प्ले' असं म्हटलं होतं. 2021 च्या पूर्वार्धात हे शफल फिचर जगभरातील सर्व युजर्ससाठी उपलब्ध होईल, अशी घोषणा नेटफ्लिक्सने मागील वर्षी केली होती. यामधून युजर्संच्या सोयीसाठी नेटफ्लिक्स किती काम करत आहे, हे दिसून येते.

नेटफ्लिक्सचे हे नवे फिचर नेटफ्लिक्सच्या टीव्ही अॅपमध्ये तुम्हाला दिसून येईल. तुमच्या नेटफ्लिक्सच्या होम पेजच्या डाव्या बाजूला असलेल्या नेव्हीगेशन मेन्यू मध्ये तुमच्या प्रोफाईल नावाखाली हे फिचर दिसून येईल. लवकरच या फिचरचे टेस्टिंग मोबाईल डिव्हाईसेसवर सुरु होईल. दरम्यान, नेटफ्लिक्स हे सर्वात लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म असून याद्वारे विविध प्रकारच्या कन्टेट प्रेक्षकांसाठी सादर केले जातात.



संबंधित बातम्या

SA vs PAK 2nd Test 2025 Capetown Stats: न्यूलँड्समध्ये खेळवला जाणार दक्षिण आफ्रिका- पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना, जाणून घ्या मैदानावरील घातक आकडेवारी

SA vs PAK 2nd Test 2025 Live Streaming India: नववर्षात कोण करणार विजयी सुरुवात? पाकिस्तानसाठी 'करो या मरो' सामना, भारतात कुठे पाहून घेणार सामन्याचा आनंद, घ्या जाणून

AUS vs IND 5th Test, Sydney Pitch Report And Stats: ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया यांच्यातील सामन्यापूर्वी सिडनी क्रिकेट ग्राउंडची आकडेवारी पहा; खेळपट्टीचा अहवाल, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू कोण

BRH vs MLS BBL 2024-25 Dream11 Team Prediction: ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात आज रोमांचक सामना; खेळपट्टीचा अहवाल, हेड टू हेड आणि सर्वोत्तम ड्रीम11 संघ येथे पहा