NASA Astronaut Shared Picture of Moonset Over Pacific: नासाच्या अंतराळवीराने शेअर केला चंद्राचा फोटो; पॅसिफिक महासागराच्या वरून 'असा' दिसतो चांदोबा, See Pic
दरम्यान, नासाचे अंतराळवीर मॅथ्यू डॉमिनिक, जे जवळजवळ चार महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर वास्तव्य करत आहेत, त्यांनी अलीकडेच पॅसिफिक महासागराच्या वरून चंद्राचा एक खास फोटो कॅप्चर केला आहे.
NASA Astronaut Shared Picture of Moonset Over Pacific: नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (NASA) अनेकदा आपल्या पृथ्वीची आश्चर्यकारक छायाचित्रे कॅप्चर करतात. जे पाहिल्यानंतर अवकाश प्रेमी मंत्रमुग्ध होतात. यूएस स्पेस एजन्सी (US Space Agency) चे सोशल मीडिया हँडलवर अवकाश प्रेमींसाठी एक खजिना शेअर केला आहे. दरम्यान, नासाचे अंतराळवीर मॅथ्यू डॉमिनिक, जे जवळजवळ चार महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर वास्तव्य करत आहेत, त्यांनी अलीकडेच पॅसिफिक महासागरा (Pacific Ocean) च्या वरून चंद्राचा एक खास फोटो (Moon Photo) कॅप्चर केला आहे.
या फोटोत तुम्ही प्रशांत महासागरावरून चांदोबा कसा दिसतो ते पाहू शकता. 'प्रशांत महासागरावर चंद्र मावळत आहे. हवाई जवळ उष्णकटिबंधीय वादळ होन शूट करण्यासाठी कपोलामध्ये गेलो. परंतु, आम्ही वादळ पार करत असताना चंद्र मावळू लागला होता,' असा डॉमिनिकने फोटोला कॅप्शन देताना म्हटलं आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ढग आणि पृथ्वीच्या वातावरणाचा निळा रंग दिसत आहे. जबरदस्त फोटोबद्दल तांत्रिक तपशील देताना डॉमिनिकने लिहिले, '400mm, ISO 500, 1/20000s शटर स्पीड, f2.8, क्रॉप्ड, डिनोइस्ड.' (हेही वाचा - Sunita Williams आणि Butch Wilmore यांचा अंतराळातला मुक्काम फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढला; SpaceX च्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टन परतणार,NASA ने दिली माहिती)
पॅसिफिक महासागराच्या वरून असा दिसतो चांदोबा -
सोशल मीडियावर हे छायाचित्र सद्या प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोसाठी डॉमिनिकचेही कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वी नासानेही चंद्राचे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. यात यूएस स्पेस एजन्सीने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या आतील "युनिक व्हँटेज पॉईंट" वरून चंद्र उगवल्याचा फोटो शेअर केला होता. तो फोटोही मिस्टर डॉमिनिकने क्लिक केला होता.