Most Asked Questions On Google: इंटरनेटवर सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न कोणते? घ्या जाणून

ज्यामध्ये जगभरातील लोकांच्या मनातील प्रश्न कोणते याचा साधारण अंदाज बांधता आला आहे. त्यातील पहिल्या काही प्रश्नांची यादी इथे दिली आहे.

Google Search | (Photo credit: archived, edited, representative image)

जिज्ञासू लोक उत्तरांसाठी अनेकदा Google कडे वळतात. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की सर्च इंजिनवर वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत? Google वर सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या टॉप 1000 प्रश्नांची संपूर्ण यादी अलिकडेच जागतिक शोध व्हॉल्यूम आणि प्रति-क्लिक-मूल्य डेटासह जाहीर  करण्यात आली आहे. ज्यामध्ये जगभरातील लोकांच्या मनातील प्रश्न कोणते याचा साधारण अंदाज बांधता आला आहे. त्यातील पहिल्या काही प्रश्नांची यादी इथे दिली आहे. जी आपणही जाणून घेऊ शकता आणि तुमच्याही मनात असेच काही प्रश्न असतात का? याबाबत विचार करु शकता.

इंटरनेटवरील एका शोध अभ्यासानुसार, Google वर सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या प्रश्न आहे "माझा आयपी काय आहे" (what is my IP). अनेकांना कदाचित आश्चर्य वाटले असेल पण, सुमारे हे. 3 दशलक्षाहून अधिक लोक दर महिन्याला ही क्वेरी शोधतात. (हेही वाचा, Google Warning: गुगलकडून अलर्ट जारी; लाखो युजर्सना हॅकिंगचा धोका, चुकूनही 'हे' करू नका)

खरे तर इंटरनेट म्हणजे एक समुद्र. जितके शोधावे आणि पाहावे तेवढी त्याची खोली कमीच. त्यामुळे इंटरनेटवर घडणाऱ्या घटना आणि घडामोडी यांचा सातत्याने विचार केला जातो. संशोधन सुरु असते. त्यामुळे इंटरनेटवर शोधल्या जाणाऱ्या बाबींमध्ये नाविन्य तर असतेच परंत अनेकदा त्यात पुनरावृत्तीही असते. कधी कधी जगभरातून इंटरनेटवर विशिष्ट गाणे, संकल्पना, व्यक्तीचे नाव किंवा अशीच काहीतरी बाब शोधली जाते. त्यामुळे त्याचाही समावेश इंटरनेटवर शोधल्या जाणाऱ्या बाबींमध्ये केला जातो. ज्यात काही टीव्ही शो, चित्रपट आणि गाणी यांचा समावेश होतो.

इंटरनेटवर कधी कधी अशाही काही बाबी सर्च होतात ज्या सामान्यपणे उघडपणे बोलल्या जात नाहीत. काहींवर कायदेशीररित्या निर्बंध आहेत. काही धोकादायक असतात. अशा बाबींची येथे दखल घेतली गेली नाही. जसे की, आत्महत्येसंबंधी, बॉम्ब किंवा शस्त्रास्त्रनिर्मिती, स्फोटके, विष अथवा फसवणूक, सायबर गुन्हेगारी यांबाबत इंटरनेटवर संशोधन करणे, माहिती देणे, घेणे याला बरेच निर्बंध आहेत. शिवाय चाइल्ड पोर्नोग्राफीबद्दलही इंटरनेटवर निर्बंध आहेत. त्यामुळे त्याबातब केल्या जाणाऱ्या शोधांची दखल घेतली जात नाही.