Ministry of I&B Cautions Social Media Influencers: 'ऑनलाइन सट्टेबाजी', 'जुगार' संदर्भात सोशल मीडिया प्रभावकांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून इशारा

प्रभावकांनी आपला मंच ऑनलाईन जुगार (Gambling), सट्टेबाजी (Online Betting) अथवा त्याला पुरक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्यासाठी वापरु नये.

Social Media | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information and Broadcasting) सोशल मीडिाया प्रभावकांना (Social Media Influencers) सावधानतेचा इशारा दिला आहे. प्रभावकांनी आपला मंच ऑनलाईन जुगार (Gambling), सट्टेबाजी (Online Betting) अथवा त्याला पुरक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्यासाठी वापरु नये. आपल्या मंचावरुन अशा कोणत्याही ऑफलाईन अथवा ऑनलाईन सट्टबाजीचा प्रचार, प्रसार अथवा समर्थन करणारा मजकूर आपल्या सोशल मीडिया मंचावर आढळून आल्यास तो तातडीने हटवला जाईल किंवा आपले खातेही ब्लॉक केले जाईल, असा कारवाईचा स्पष्ट इशारा मंत्रालयाने दिला आहे.

पीआयबीने माहिती देताना म्हटले आहे की, सोशल मीडियावरुन केल्या जाणाऱ्या ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगाराच्या जाहिरातींचा आर्थिक आणि समाजावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. खास करुन तरुणाईवर त्याचा मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे मंत्रालयाने सल्ला दिला आहे की, ऑनलाइन जाहिरात मध्यस्थांनी भारतीय प्रेक्षकांसाठी अशा प्रचारात्मक सामग्रीला प्राधान्य देऊ नये. त्याला उत्तेजन मिळेल अशी सामग्री प्रसारीत, प्रकाशित करु नये. खास करुन सोशल मीडिया प्रभावकांनी या बाबत कटाक्षाणे पाळाव्यात. या प्रभावकांसाठी संवेदनशीलतेचे प्रयत्न करण्याची सूचना देण्यात आली आहे, असे अहवालात म्हटले आहे. (हेही वाचा, YouTube Fake News: खोटे वृत्त दिल्याबद्दल 10 युट्यूब चॅनलवरील 45 व्हिडिओ ब्लॉक; भारत सरकारचा दणका)

सोशल मीडियावरील जे प्रभावक माहिती आणि प्रसारण मंत्रालय द्वारे दिलेला सल्ला पाळण्यात अयशस्वी होतील किंवा ऑनलाईन मंचाच्या माध्यमातून ते सट्टेबाजी, ऑनलाईन जुगाराची जाहीरात करती त्यांच्या खात्यावरील मजकूर काढून टाकला जाईल अथवा थेट कारवाई करत त्यांचे खातेही बंद अथवा स्थगित करण्यात येईल. या प्रभावकांवर ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसुद्धा केली जाईल. (हेही वाचा, I&B Ministry Advisory for TV Channels: लोकांचे लक्ष विचलीत होईल अशी दृश्ये टाळा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा दूरचित्रवाहिन्यांना सल्ला)

दरम्यान, या आधी, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने 6 मार्च 2024 रोजी एक सूचनापत्र जारी केला होता. त्यामध्ये CCPA ने सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींकडून बेटिंग/जुगार प्लॅटफॉर्मच्या समर्थन आणि त्यांच्या सट्टेबाजी क्रियाकलापांना प्रोत्साहन देण्यासाठी चिंता व्यक्त केली होती. तसेच त्यांना सावधानतेचा इशारा देत म्हटले होते की, अशी कोणतीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिरात किंवा समर्थन कठोर तपासणीच्या अधीन असेल.

एक्स पोस्ट

सोशल मीडिया प्रभावक स्वतःला एका विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ म्हणवतात. ते त्यांचे ज्ञान एक किंवा माहिती समाजमाध्यमांवर सामायिक करतात. त्यांनी दिलेली माहिती अथवा वृत्त लोकांना आवलडले तर लोक त्यांचे अनुसरण करतात. त्यांच्या सोशल मीडियावरील माध्यमालाते अनुयायी म्हणून जोडले जातात. सातत्याने नवनवी माहिती आणून ते प्रेक्षकांना गुंतवून ठेवतात. माहितीतील सातत्य आणि नाविन्य पाहून त्यांचे अनुयायी त्यांचे अनुसरण करतात. परिणामी त्यांच्या माध्यमातून केलेल्या जाहीरातींचा अवाहनाचा अनुयायांवर मोठा परिणाम होतो. ते त्यांच्यावर तसा विश्वास ठेवतात आणि अनुकरण करतात. परिणामी माहिती खोटी अथवा दिशाभूल करणारी असेल तर अनुयायांचे नुकसान होते. हे अनुयायी कोणाचेही असले तरी शेवटी ते भारतीय नागरिकच असतात. त्यामुळे फसवणूक होते ती भारतीय नागरिकाची. त्यामुले माहिती प्रसारण मंत्रालयाने या प्रभावकांना सतर्कतेचा इसारा दिला आहे.