Mi Band 6, Mi TV 5X Series, Mi Notebook Pro, Mi Notebook Ultra भारतात लॉन्च; पहा किंमत आणि फिचर्स

यात एमआय बँड 6, एमआय टीव्ही 5एक्स सिरीज, एमआय नोटबुक अल्ट्रा, एमआय नोटबुक प्रो, एमआय रनिंग शूज आणि इतर अनेक प्रॉडक्ट्सचा समावेश आहे.

Mi Band 6, Mi TV 5X Series & Mi Notebook (Photo Credits: Xiaomi)

चायनीज टेक जाएंट शाओमी (Xiaomi) ने Smarter Living 2022 इव्हेंट दरम्यान काही प्रॉडक्ट्स लॉन्च केले. यात एमआय बँड 6 (Mi Band 6), एमआय टीव्ही 5एक्स सिरीज (Mi TV 5X Series), एमआय नोटबुक अल्ट्रा (Mi Notebook Ultra), एमआय नोटबुक प्रो (Mi Notebook Pro), एमआय रनिंग शूज (Mi Running Shoes), एमआय राऊटर 4ए गिगाबीट एडीशन (Mi Router 4A Gigabit Edition) आणि एमआय 360 होम सिक्युरिटी कॅमेरा 2के प्रो (Mi 360 Home Security Camera 2K Pro) यांचा समावेश आहे. 30 ऑगस्ट 2021 पासून हे प्रॉडक्ट्स अॅमेझॉन इंडिया (Amazon India), एमआय.कॉम (Mi.com) आणि एमआय होम स्टोअर्स (Mi Home Stores) वर खरेदीसाठी उपलब्ध असतील. एमआय टीव्ही 5एक्स सिरीजचा सेल 7 सप्टेंबर पासून फ्लिपकार्ट (Flipkart), एमआय होम (Mi Home) आणि एमआय स्टुडिओ (Mi Studio) वर सुरु होईल.

यात 1.56 इंचाचा फुल स्क्रिन AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून SpO2 tracking आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग, स्ट्रेस मॉनेटरिंग, ब्रिदिंग एक्ससाईज आणि इत्यादी फिचर्स देण्यात आले आहेत.

फिटनेस ट्रॅकरमध्ये 30 वेगवेगळे मोड्स देण्यात आले आहेत- basketball, boxing, walking, running, HIIT, core training, Zumba, pilates, badminton आणि इत्यादी. 50 मीटर वॉटर रेझिस्टंट असून याची बॅटरी 5 दिवसांपर्यंत चालू शकते आणि नॉर्मल मोडमध्ये 14 दिवसांपर्यंत चालू शकते.  एमआय स्मार्ट बँड 6 ची किंमत 3499 रुपये इतकी आहे.

Mi Band 6 (Photo Credits: Xiaomi)

Mi TV 5X Series तीन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे- 43-inch, 50-inch आणि 55-inch. यात प्रिमियम मेटालिक बेझल लेस डिझाईन आणि मेटालिक स्टँड देण्यात आलं आहे. यात 4K HDR डिस्प्ले, विविड पिक्चर इंजिन 2 टेक्नॉलोजी आणि अॅडेपटिव्ह ब्राईटनेस सह देण्यात आला आहे. Mi TV 5X  मध्ये 40W स्टिरिओ स्पीकर्स डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट सह देण्यात आला आहे. Mi TV 5X  43 इंचाचा मॉडल 31,999 रुपये, 50 इंचाचा मॉडल 41,999 रुपये आणि 55 इंचाचा मॉडल 47,999 रुपयांना उपलब्ध आहे.

Mi Notebook (Photo Credits: Xiaomi)

एमआय नोटबुक सिरीज दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे- एमआय नोटबुक प्रो आणि एमआय नोटबुक अल्ट्रा. एमआय नोटबुक प्रो 56,999 रुपयांना उपलब्ध असून कोर आय5 प्रोसेसर आणि 8जीबी रॅम देण्यात आली आहे. तर कोर आय5 मॉ़ल 16जीबी रॅमची किंमत 59,999 रुपये इतकी आहे. लॅपटॉप कोर आय7 प्रोसेसर आणि 16जीबी रॅम 72,999 रुपयांना उपलब्ध आहे.

Mi Notebook (Photo Credits: Xiaomi)

एमआय नोटबुक अल्ट्रा 8 जीबी रॅम आणि इंटेल कोर 59,999 रुपयांना उपलब्ध असून कोर आय5+16जीबी रॅम आणि कोरआय 7+16जीबी रॅम मॉडल 63.999 आणि 76.999 रुपयांना उपलब्ध आहे.

एमआय नोटबुक प्रो मध्ये 14 इंचाचा 2.5K डिस्प्ले 2560x1600 पिक्सल रिज्योल्युशन सह देण्यात आला आहे. यात 15.6 इंचाचा 3.2K डिस्ल्पे 90Hz रिफ्रेश रेट सह देण्यात आला आहे. एमआय टीव्ही 5एक्स सिरीज मध्ये प्रोसेसरचे दोन पर्याय आहेत- इनटेल कोर आय5 आणि कोर आय7 इनटेल Iris Xe graphics 16 जीबी रॅम आणि 512जीबी इंटरनल स्टोरेज सह देण्यात आला आहे. हे दोन्ही मॉडेल्स विंडोज 10 होम आऊट ऑफ बॉक्स वर काम करतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif