Lyfas Mobile App स्मार्टफोन मधुन बॉडी सिग्नल तपासून कोरोना व्हायरस रुग्णांना ओळखण्यात करणार मदत, नेमका काय आहे हा ऍप?
Lyfas COVID score असे या मोबाइल अॅपचे नाव असून स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या शरीरातील अनेक सिग्नलस ओळखण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे,
Lyfas Mobile App : भारतातील कोरोना व्हायरसच्या साथीने उद्भवलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, कोरोना व्हायरस संसर्ग झालेल्या लोकांना शोधण्यासाठी बेंगळुरूमधील Acculi या स्टार्टअपने मोबाइल ऍप तयार केला आहे. Lyfas COVID score असे या मोबाइल अॅपचे नाव असून स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या शरीरातील अनेक सिग्नलस ओळखण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे, याच माध्यमातून कोरोना संबधीत लक्षणांचा सुद्धा तपास करता येईल. केंद्र सरकारच्या वतीने यासाठी Acculi लॅब ची निवड करण्यात आली आहे. Lyfas हे क्लिनिकल ऍप असून सर्व प्रकारच्या स्मार्टफोन मध्ये काम करते. या माध्यमातून कोरोनाला पहिल्याच टप्प्यात ओळखणे सोप्पे होईल अशी अपेक्षा आहे. कोरोना सोबतच अन्य आजारात घरगुती उपाय सुहवण्याचे काम सुद्धा हे ऍप करू शकते. सध्या तरी या ऍप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. याच्या क्लिनिकल चाचण्या आणि उर्वरित काम सप्टेंबर अखेरीस पूर्ण होईल यांनतर सामान्य जनतेतही सुरुवातीला याच्या चाचण्या घेतल्या जातील.
‘Lyfas’ App नेमके काय काम करणार?
-Lyfas हे एक Android App आहे. जेव्हा युजर आपल्या फोनच्या कॅमेऱ्यावर पाच मिनिट बोट ठेवेल तेव्हा त्या माध्यमातून बॉडी हिट आणि अन्य सिग्नल जमा करण्याचे काम हा ऍप करेल.
-रक्तदाब आणि नाडी तपासण्याचे सुद्धा काम याच माध्यमातून होईल. हे सर्व काम स्मार्टफोनची ऊर्जा आणि सेन्सर च्या माध्यमातून पूर्ण होईल.
-हे सिग्नल्स Photoplethysmography (PPG), Photo Chromatography (PCG), Arterial Photoplethysmography (APPG), mobile spirometry, आणि Pulse Rate Variability (PRV) च्या आधारे तपासले जातील.
-Lyfas शरीरातील Cardio-Respiratory, Cardio-Vascular, Hematology, Hemorheology, Neurology या आधारे पॅथोफिजियोलॉजिकल बदलांचा मागोवा घेते. हे बदल पुढे ऑर्गन सिस्टम-व्यापी प्रतिसादामध्ये व्यक्त केले जातील
दरम्यान, डीएसटीच्या समर्थनासह विकसित केलेले नवीन तंत्रज्ञान, एक रोगविरोधी व्यक्तीमध्ये संभाव्य संसर्ग शोधू शकेल. त्या व्यक्तीमधील लक्षणे स्पष्ट नसतानाच जर का ओळखला गेला तर बरे होण्याची प्रक्रिया लवकर सुरु करता येईल. तसेच ज्यांच्या लक्षणे आहेत त्यांना लगेच कळून उपचार घेता येतील. सुरुवातीला क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींसाठी हे तंत्रज्ञान वापरता येईल. लिफास मोबाईल अॅप नुसार लक्षणे नसलेल्या व्यक्तींमध्ये विषाणूंना ओळखण्याची 92% अचूकता असल्याचे मेदांता हॉस्पिटल मधील प्राथमिक चाचणीत दिसून आले आहे.