चीन मध्ये Google, Facebook नंतर आता LinkedIn सुद्धा होणार बंद, मायक्रोसॉफ्टने केली मोठी घोषणा

लिंक्डइन अमेरिकेतून संचालित केला जाणारा अखेरचा प्रमुख सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म आहे.

लिंक्डइन (Photo credit : Sahil Popli)

मायक्रोसॉफ्टने गुरुवारी घोषणा करत चीन मध्ये आपला सोशल नेटवर्किंग अॅप लिंक्डइन (LinkedIn) लोकल वर्जन बंद करणार असल्याचे म्हटले. लिंक्डइन अमेरिकेतून संचालित केला जाणारा अखेरचा प्रमुख सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म आहे. जो अद्याप ही चीन मध्ये सुरु आहे. तर 2014 मध्ये चीन मध्ये लिंक्डइन लॉन्च करण्यात आले होते. मात्र काही मर्यादित फिचर्ससह ते रोलआउट केले होतो. दुसऱ्या शब्दात बोलायचे झाल्यास एका नव्या वर्जनसह ते लॉन्च केले होते. जेणेकरुन विदेश कंपन्यांसाठी इंटरनेटचे जे काही कठोर नियम आहेत त्यांचे पालन होईल.

मायक्रोसॉफ्टने असे म्हटले की, चीन मध्ये कामकाजा संबंधित आव्हानात्मक परिस्थिती आणि कठोर नियमांमुळे लिंक्डइन बंद करण्यात येत आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्टने असे ही म्हटले की, लिंक्डइन ऐवजी नोकरी सर्चसाठी एक वेबसाइट तयार केली जाईल. ज्यामध्ये लिंक्डइनच्या सोशल नेटवर्कचे फिचर नसणार आहे.(Upcoming Mobile: ओप्पोचा नवीन OPPO A54s स्मार्टफोन लवकरच येणार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये) 

चीनमध्ये फेसबुक ते स्नॅपचॅट पर्यंत जवळजवळ सर्वच प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. ऐवढेच नव्हे तर गुगल सर्चवर ही बॅन आणण्यात आले आहे. याच्या जागी चीनने स्वत:चे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु केले आहे. त्याचसोबत चीनमधील नागरिकांसाठी व्हॉट्सअॅप ऐवजी wechat फेसबुक-ट्विटर ऐवजी Sina Weibo, गुगल ऐवजी Baidu Tieba, मेसेंजर ऐवजी Tencent QQ आणि युट्युब ऐवजी Youku Toudo आणि Tencent Vido सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करतात.