LinkedIn Top 25 Companies in India: लिंक्डइनने जारी केली यंदाची देशातील 25 सर्वोत्तम कंपन्यांची यादी; भारतात काम करण्यासाठी TCS सर्वात उत्तम
आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतांश कंपन्यांनी या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. याशिवाय आयटी सेक्टर, डेटा स्टोरेज टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित अनेक कंपन्यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे.
LinkedIn Top 25 Companies in India: व्यावसायिक नेटवर्किंग साइट लिंक्डइन (LinkedIn) दरवर्षी भारतात काम करण्यासाठी 25 सर्वोत्तम कंपन्यांची (Top 25 Companies in India) यादी प्रसिद्ध करते. आता वर्ष 2024 साठी टॉप 25 कंपन्यांची यादी देखील जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने पहिले स्थान पटकावले आहे. लिंक्डइनने जाहीर केलेल्या यादीनुसार, भारतात काम करणाऱ्या टॉप कंपन्यांच्या यादीत Accenture आणि Cognizant यांची नावे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतांश कंपन्यांनी या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. याशिवाय आयटी सेक्टर, डेटा स्टोरेज टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित अनेक कंपन्यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे.
लिंक्डइनने 500 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांचा टॉप 25 कंपन्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षीही टीसीएस कंपनी या यादीत अव्वल होती. अशा परिस्थितीत कंपनीने आपले स्थान कायम ठेवले आहे. या यादीत मॅक्वेरी ग्रुप (Macquarie) चौथ्या स्थानावर, मॉर्गन स्टॅनली (Morgan Stanley) पाचव्या आणि डेलॉइट (Deloitte) सहाव्या स्थानावर आहे.
पुढे या यादीत एन्ड्रेस+हॉसर ग्रुप (Endress+Hauser Group), ब्रिस्टल मायर्स स्क्विब (Bristol Myers Squibb), जेपी मॉर्गन चेस अँड कं (JPMorgan Chase & Co.) आणि पेप्सिको (PepsiCo) यांचा नंबर लागतो. डीपी वर्ल्ड (DP World), एचसीएल एंटरप्राइझ (HCL Enterprise), इवाय (EY), श्नाइडर इलेक्ट्रिक (Schneider Electric), ऍमेझॉन (Amazon), Continental, मास्टरकार्ड (Mastercard), इंटेल कॉर्पोरेशन (Intel Corporation), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), मिशेलिन (Michelin), फोर्टिव्ह (Fortive), वेल्स फार्गो (Wells Fargo), गोल्डमन सॅक्स (Goldman Sachs), नोवो नॉर्डिस्क (Novo Nordisk) आणि व्हायाट्रिस (Viatris) या कंपन्या टॉप 25 मध्ये आहेत. (हेही वाचा: Zomato GST Notice: झोमॅटो कंपनीला जीएसटीची नोटीस, 11.81 कोटी भरण्याचे आदेश)
याशिवाय लिंक्डइनने देशातील अशा शहरांची यादीही जारी केली आहे जी कंपन्यांच्या बाबतीत सर्वोत्तम आहेत. यामध्ये आयटी सिटी बेंगळुरूने अव्वल स्थान पटकावले आहे. याशिवाय हैदराबाद, मुंबई महानगर प्रदेश आणि पुणे या शहरांनाही या यादीत स्थान मिळाले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)