Mitchell Baker Resigns: मिशेल बेकर यांचा राजीनामा, लॉरा चेंबर्स Firefox निर्माता Mozilla च्या नवीन सीईओ
स्वत: बेकर यांनीच ही माहिती गुरुवारी (8 फेब्रुवारी) रोजी दिली. त्यांनी सांगिले की, या निर्णयानंतर आपण लवकरच सॉफ्टवेअर हाऊसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा हाती घेत आहोत.
Laura Chambers New CEO of Firefox Maker Mozilla: मिशेल बेकर (Mitchell Baker Resigns) फायरफॉक्स निर्माता मोझिला (Firefox Maker Mozilla) कॉर्पोरेशन कंपनीच्या सीईओ पदावरुन पायऊतार होत आहेत. स्वत: बेकर यांनीच ही माहिती गुरुवारी (8 फेब्रुवारी) रोजी दिली. त्यांनी सांगिले की, या निर्णयानंतर आपण लवकरच सॉफ्टवेअर हाऊसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा हाती घेत आहोत. पाठीमागील जवळपास 25 वर्षे मी मोझीलासोबत काम करण्याचे सातत्य ठेवले. या काळात आम्ही अनेक चढ-उतार पाहिले. यशाची अनेक शिखरं गाठली. दरम्यान, आता बदलाची आवश्यकता होती. त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे बोकर यांनी निर्णयानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. दरम्यान, मिशेल बेकर यांच्या जागी लॉरा चेंबर्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मिशेल बेकर यांच्या जागी लॉरा चेंबर्स यांची नियुक्ती
मिशेल बेकर यांनी फायरफॉक्स निर्माता मोझिला कॉर्पोरेशनचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी लॉरा चेंबर्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते टेक एक्झिक्युटीव्ह आहेत आणि त्यांनी 2021 पासून कंपनीच्या संचालक मंडळात काम केले आहे. लिंक्डीनवरील आपल्या पोस्टमध्ये चेंबर्स यांनी म्हटले आहे की, मोझिलाचे सीईओ म्हणून माझ्याकडे मोठी जाबाबदारी येत आहे. आगामी काळात इंटरनेट आणखी व्याप्त होण्यासाठी कार्यक्षमतने काम करु. ज्यामुळे इंटरनेट सेवा आणखी चांगली होईल. आम्ही इंटरनेटचा प्रभाव मानवी मुल्ये आणि प्रगतीशिलता वाढविण्यासाठी करु. आम्ही आदर्शवादाची कास धरु. खास करुन नकारात्मकता आणि विभाजनवाद याला इंटरनेट पाठिंबा देणार नाही. (हेही वाचा, Binny Bansal Resigns From Flipkart: फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांचा राजीनामा; नवीन E-com व्यवसाय सुरू करणार)
सूत्रे हाती घेताच टाळेबंदीचा निर्णय
मिशेल बेकर यांनी सन 2005 ते 2008 या काळात मोझीलाच्या सीईओ म्हणून काम पाहिले. पुढे त्यांनी 2019 मध्ये त्यांनी दमदार पुनरागमन केले. ख्रिस बियर्ड यांच्यानंतर कंपनीची सूत्रे हाती घेतली. दरम्यान, त्यांनी सूत्रे हाती घेताच कोरोना काळ आला आणि लॉकडाऊन सुरु झाला. लॉकडाऊन सुरु अतानाच त्यांनी सन 2020 मध्ये औपचारीकपणे सूत्रे हाती घेतली. त्यानंर अवघ्या चारच महिन्यात त्यांनी त्यांनी टाळेबंदीचा (Layoffs) निर्णय घेतला. कोविड महामारीचा कंपनीच्या आर्थिक उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढकरण्यासाठी आणि भविष्यात चांगल्या योजना आनण्यासाठी टाळेबंदी आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी जवळपास 250 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत असल्याची घोषणा केली.
दरम्यान, मोझीलाने राबवलेल्या टाळेबंदीविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष होता. काहींनी कंपनी व्यवस्थापनावर चुकीच्या व्यवस्थापनाचा आरोप लावला. तसेच, कंपनीती मोठ्या अधिकाऱ्यांना अधिक प्रमाणावर देयके वेतनरुपात दिली जातात. कंपनीच्या उत्पन्नाचा 30% हिस्सा यावर खर्च होत असल्याचाही काहींचा आरोप होता. यातील तथ्य फारसे कधीच पुढे आले नाही. मात्र, पाठिमागील पाच वर्षांमध्ये कंपनीने मोठे नुकसान सहन केले. कर्मचाऱ्यांनाही टाळेबंदीला सामोरे जावे लागले. मात्र, मिशेल बेकर यांच्या पगारात मात्र मोठी वाढ झाल्याचा आरोप करण्यात आला होता.