Joseph Antoine Ferdinand Plateau Google Doodle: जोसेफ प्लाटो गूगल डूडल आहे खास; घ्या जाणून
'बर्निंग मैन फेस्टिवल' हे गुगलचे पहिले डूडल होते. गुगलने आपले सर्ज पेज पहिल्यांदाच बदलले होते. त्यानंतर 2012 मध्ये गूगलने डूडलला नवे रुप दिले. हे डूलल Pac-Man वीडियो गेम 30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तयार करण्यात आले होते.
जोसेफ प्लाटो स्मृतिदिन गूगल डूडल: जगप्रसिद्ध भौतिकशास्त्र शास्त्रज्ञ जोसेफ एंटोनी फर्डिनेंड प्लाटो (Joseph Antoine Ferdinand Plateau) यांचा आज 218 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलून खास डूडल (Google Doodle) बनवले आहे. जोसेफ एंटोनी फर्डिनेंड प्लाटो (Joseph Plateau) हा बेल्जियन भौतिकशास्त्रज्ञ होता. हलत्या चित्रांच्या आभासाचे प्रात्यक्षिक दाखवणारा तो पहिला शास्त्रज्ञ आहे. प्लाटोचा जन्म 14 ऑक्टोबर 1801 या दिवशी झाला होता.
जोसेफ एंटोनी फर्डिनेंड प्लाटो यांच्या अॅनिमेटेड डिस्क मुव्हींग पिक्चर बनवण्याचे योगदान पाहूनच गुगलने आजचे डूडल बनवले आहे. आजच्या गुगलमध्ये प्लोटोची स्टाइल डिस्क लावण्यात आली आहे. जोसेफ प्लाटो याचे वडील फ्लावर पेंटींगचे काम करते. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर प्लाटो यांनी भौतिकशास्त्र क्षेत्रात संशोधन सुरु केले. पुढे अल्पावधीतच प्लाटो हे 19 व्या शतकातील बेल्जियम मोठे शास्त्रज्ञ बनले. (हेही वाचा, अमृता प्रीतम यांचा 100वा स्मृतिदिन Google Doodle, पंजाबी भाषेतील या लोकप्रिय कवयत्रीबद्दल घ्या जाणून)
गूगलने 1998 मध्ये पहिले डूडल बनवले. 'बर्निंग मैन फेस्टिवल' हे गुगलचे पहिले डूडल होते. गुगलने आपले सर्ज पेज पहिल्यांदाच बदलले होते. त्यानंतर 2012 मध्ये गूगलने डूडलला नवे रुप दिले. हे डूलल Pac-Man वीडियो गेम 30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तयार करण्यात आले होते. गूगल डूडल हे सार्वजनिक उत्सव, सुट्ट्या, जगप्रसिद्ध घटना, जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व, संख्या आदी गोष्टींना उजाळा देण्यासाठी, या गोष्टींचे कौतुक करण्यासाठी बनवते. गुगल डूडल हे गुगलच्या सर्च पेजच्या मुखपृष्ठावर असते.