Jio AirFiber 19 सप्टेंबर रोजी होणार लॉन्च, Reliance AGM 2023 मध्ये मुकेश अंबानी यांची घोषणा

येत्या 19 सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी दिवशी Jio AirFiber (जिओ फायबर) सेवा लॉन्च होईल, अशी मुकेश अंबानी यांनी घोषणाही त्यांनी केली.

Mukesh Ambani | (File Image)

Reliance Industries Limited AGM: भारत सन 2047 पर्यंत पूर्णपणे विकसीत राष्ट्र असेल. त्यामध्ये रिलायन्स समूहाचा मोठा वाटा असेल. म्हणूनच नवीन रिलायन्स उदयोन्मुख नवीन भारताचा अग्रदूत आहे. त्यासाठी आम्ही अशक्य वाटणारी उद्दिष्टे निश्चित केली आणि ती साध्यही केली आहेत, असे रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. दरम्यान, येत्या 19 सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी दिवशी Jio AirFiber (जिओ फायबर) सेवा लॉन्च होईल, अशी घोषणाही त्यांनी केली. रिलायन्स इंडस्ट्री लिमीटेड अर्थात (Reliance Industries Limited) अर्थात आरआयएल (RIL) ची ची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 2023 सोमवार, म्हणजेच 28 ऑगस्ट 2023 रोजी पार पडली. . AGM व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या सभेला RIL चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, याच सभेत ईशा, आकाश आणि अनंत अंबानी यांची RIL बोर्डावर नियुक्ती करण्यात आल्याची घोषणाही करण्यात आली.

रिलायन्स एजीएम 2023 मध्ये फ्युचर रिटेल IPO, रिलायन्स जिओ IPO, 5G डिव्हाइसेसचे लॉन्चिंग, Jio फायनान्शिअल सर्व्हिसेसचे तपशील आणि भविष्यात RIL च्या उत्तराधिकाराच्या योजनांबद्दल बाजाराला अनेक घोषणा होतील अशी पाठिमागील काही दिवसांपासूनच चर्चा होती.

RIL मधील महत्त्वाच्या घोषणा

दरम्यान, मुकेश अंबानी यांनी सर्वसाधारण सभेत बोलताना म्हटले की, भारतीयांचा इंटरनेट वापराचा सरासरी वेग वाढला आहे. सरासरी वापरकर्ता दरमहा 25 GB पेक्षा जास्त वापरत असताना Jio ने त्यात मोठी वाढ केली आहे. ही वाढ जवळपास 1100 कोटी GBs च्या मासिक डेटा ट्रॅफिकपर्यंत जाते. जी वार्षीक वाढ 45% दर्शवते, असे ते म्हणाले. सात वर्षांपूर्वी रिलायन्स जिओ एक महत्त्वाकांक्षी मिशन म्हणून लॉन्च करण्यात आले होते. भारताला प्रीमियर डिजिटल सोसायटीमध्ये बदलण्यासाठी त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली. या मिशनला भारतीयांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिल्यानंतर आम्ही आता सीमापार जाण्यासाठी उत्सुक आहोत, असेही ते म्हणाले.

 Jio AirFiber लॉन्चींग डेट

मुकेश अंबानी यांनी Jio AirFiber लॉन्च केले. या लॉन्चिंगदरम्यान त्यांनी एक महत्त्वाची माहितीही दिली. त्यांनी म्हटले की, ऑप्टिकल फायबरद्वारे, आम्ही सध्या दररोज सुमारे 15,000 नवे प्रदेश जोडू शकतो. मात्र Jio AirFiber सह, आम्ही दररोज 150,000 कनेक्शन्ससह या विस्ताराला सुपरचार्ज करू शकतो, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी घोषणा केली की Jio AirFiber 19 सप्टेंबर रोजी लॉन्च होईल. आज, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर Jio AirFiber लाँच होईल, ज्यामुळे आम्हाला ग्राहक मूल्य आणि महसूल वाढीसाठी आणखी एक मार्ग मिळेल, असे ते माहिती देताना म्हणाले.