SkyDrive Flying Car: जपानी कंपनी निर्मित हवेत उडणाऱ्या गाडीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण (Watch Video)

जापनीज कंपनी स्कायड्राईव्ह फ्लॉयिंग कार बनवण्याच्या प्रोजेक्टवर काम करत असून ते आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचले आहे.

Flying cars (Photo Credits: YouTube Grab)

लहानपणी कॉर्टुन बघताना तुम्ही उडणाऱ्या गाड्या पाहिल्या असतील आणि 21 व्या शतकात त्या फ्लायिंग कार्स सत्यात अवतरणार आहेत. जपानी कंपनी स्कायड्राईव्ह फ्लॉयिंग कार (SkyDrive Flying Car) बनवण्याच्या प्रोजेक्टवर काम करत असून ते आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचले आहे. या फ्लॉयिंग कार्सची चाचणी करण्यात आली आहे. या कारमध्ये फक्त एका व्यक्तीला बसवून जमिनीपासून काही फूटांवर हवेत ही कार उडवण्यात आली. सुमारे 4 मिनिटे या कारची टेस्टिंग करण्यात आली. कंपनीची ही प्रगती बघता येत्या 3-4 वर्षात फ्लॉयिंग कार बाजारात उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती कंपनीच्या सीईओंनी दिली आहे.

वेगवान आणि वेळेत पोहचवणाऱ्या वाहतुकीसाठी जपान प्रसिद्ध आहे. स्कायड्राईव्हचे हेड Tomohiro Fukuzawa यांनी सांगितले की, "जगातील 100 पेक्षा अधिक फ्लॉयिंग कार प्रोजेक्ट्सपैकी  मोजक्याच प्रोजेक्टची चाचणी यशस्वी झाली आहे. खूप लोकांना ही गाडी चालवण्याची इच्छा असेल, अशी आशा आहे." एका स्विफ्ट बाईकसारखी दिसणारी ही कार एका प्रवाशाला घेऊन यशस्वीरीत्या उडू शकते. या कारची स्टॅबिलिटी एका कम्प्युटरद्वारे हाताळली जाते. या कारचा रंग सफेद असून याचा पुढील भाग एका विमानासारखा दिसतो.

पहा व्हिडिओ:

जगातील सर्वात छोटे व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग मॉडलच्या डिझाईननुसार ही कार बनवण्यात आली आहे. ही कार कॉपेक्ट असून दोन पार्किंग स्पॉट इतकी जागा व्यापते. या कारमध्ये प्रवासदरम्यान इमर्जन्सी सेफ्टीसाठी 8 मोटर्स देण्यात आल्या आहेत. सध्या ही गाडी केवळ 5 किमी पर्यंत प्रवास करु शकते. ही फ्लायिंग कार लोकांना वाहतुकीसाठी सोयीस्कर ठरावी आणि त्यांना सहज वापरता यावी त्याचप्रमाणे या उडणाऱ्या गाडीच्या सभोवतालची लोक सुरक्षित राहावी असा आमचा उद्देश आहे, असे Fukuzawa यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ही गाडी लॉन्च करण्याआधी बॅटरी साईज, एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि इतर बाबींवर काम गरजेचे आहे आणि आम्हाला आशा आहे की, 2023 पर्यंत या सर्व गोष्टींवर उपाय शोधून काढले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif