गुगल कडून iPhone युजर्ससाठी Google Map मध्ये मिळणार 'हे' धमाकेदार फिचर

आता कंपनीने हेच फिचर आयफोन युजर्ससाठी सुद्धा लवकरच उपलब्ध करुन देणारअसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

Google Map (Photo Credits-File Image)

दिग्गज टेक कंपनीने यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला गुगल मॅपच्या अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी डार्क मोड (Dark Mode) लॉन्च केले होते. आता कंपनीने हेच फिचर आयफोन युजर्ससाठी सुद्धा लवकरच उपलब्ध करुन देणारअसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याबद्दल माहिती MacRumor च्या एका रिपोर्ट्समधून समोर आली आहे. रिपोर्ट्समधून समोर आलेल्या माहितीनुसार, आयफोन युजर्ससाठी गुगल मॅपमध्ये येत्या काळाता डार्क मोड फिचर मिळणार आहे. हे फिचर युजर्सला सेटिंग्समध्ये जाऊन अॅक्टिव्हेट करावे लागणार आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, डार्क मोडमुळे आयफोन युजर्सच्या मोबाईलच्या बॅटरीची बचत होणार आहे. त्याचसोबत डोळ्यांना सुद्धा त्रास होणार नाही.

आयफोन युजर्सला गुगल मॅप बटणाचा वापर करुन iMessage च्या माध्यमातून लाइव लोकेशन आपल्या मित्रपरिवाराला पाठवता येणार आहे. तसेच डिफॉल्टच्या रुपात एक तास लोकेशन शेअर करण्याची सुविधा मिळते. मात्र युजर्सला सेटिंगमध्ये जाऊन ही वेळ आपल्या सोईनुसार वाढवता येणार आहे. (SpO2 ट्रॅकर आणि 1.3 इंचाचा HD डिस्प्ले भारतात लॉन्च सर्वाधिक स्वत Smartwatch, जाणुन घ्या किंमत)

तसेच गुगलकडून आणखी एक नवे अपडेट जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार गुगल मॅप हॉटेल रेस्टॉरंट, मॉस आणि कॉफी हाउसला भेट देण्यासंदर्भात नोटिफिकेशन पाठवणार आहे. त्यामुळे युजर्सला उत्तम रेटिंग असलेल्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटचा शोध घेण्यासाठी मदत मिळणार आहे. सध्या कंपनीकडून या अपडेट बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

तर गेल्याच वर्षी गुगलकडून मॅपसाठी ट्राफिक लाइट फिचर लॉन्ट केले होते. ट्रॅफिक लाइट फिचरबद्दल बोलायचे झाल्यास हे गुगल मॅपमध्ये युजर्सला ट्राफिक लाइटचे मोठे स्टिकर दाखवणार आहे. त्याचसोहत ड्रायव्हिंग दरम्यान, नेविगेशन फिचर ऑन करण्यासग रस्त्यांवरील लाइट्स बद्दल ही युजर्सला माहिती देणार आहे. या व्यतिरिक्त युजर्सला रोडवर कोठे लाइट उपलब्ध आहे आणि कोणता सी रोड सिग्नल फ्री आहे हे सुद्धा कळणार आहे.