Internet Explorer Goodbye म्हणणार, माइक्रोसॉफ्ट कंपनीची घोषणा

आजपर्यंत अनेकांना इंटरनेट जगताची ओळख करुन देणारे जगप्रसिदध इंटरनेट एक्सप्लोरर (IIE) आता निरोप घेणार आहे. इंटरनेट एक्सप्लोरर (Internet Explorer Goodbye ) ब्राऊजर निर्माता मायक्रोसॉफ्ट (Microsoft Company) कंपनीने तशी घोषणा केली आहे.

Internet Explorer | Representative Image (Photo Credits: Pixabay)

आजपर्यंत अनेकांना इंटरनेट जगताची ओळख करुन देणारे जगप्रसिदध इंटरनेट एक्सप्लोरर (IIE) आता निरोप घेणार आहे. इंटरनेट एक्सप्लोरर (Internet Explorer Goodbye ) ब्राऊजर निर्माता मायक्रोसॉफ्ट (Microsoft Company) कंपनीने तशी घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीने म्हटले आहे की, येत्या 2 जून 2022 पासून हा ब्राऊजर बंद करण्यात येणार आहे. मायक्रोसॉफ्टने 1995 मध्ये मायक्रोसॉफ्ट एज विंडोज 10 मध्ये लॉन्च केले होते. ज्या पद्धतीने मायक्रोसॉफ्ट 365 ऑनलाईन सेवांवरुन आयईई सपोर्ट समाप्तीची घोषणा केली तेव्हापासून मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर सपोर्टपासून दूर जाते आहे. ही स्थिती गेल्या वर्षभरापासून सुरु आहे.

कंपनीने बुधवारी एक प्रतिक्रिया देत मह्टले की, मायक्रोसॉफ्ट एज जबाबदारी अझित व्यापक झाल्याने इंटरनेट एक्सप्लोरर 11 डेस्कटॉप एप्लिकेशन येत्या 15 जून 2022 पासून विंडोज 10 च्या काही वर्जनमधून हटवणार आहे. इंटरनेट एक्सप्लोरर एकेकाळी सर्वाधिक आणि सर्वात व्याप्त स्वरुपात वापरले जाणारे वेब ब्राऊजर होते. 2003 पर्यंत सुमारे 95% युजर्स हे ब्राऊजर वापरत होते. (हेही वाचा, Bill आणि Melinda Gates 27 वर्षांच्या संसारानंतर विभक्त होणार; Bill & Melinda Gates Foundation साठी मात्र एकत्र काम सुरूच राहणार)

फायरफॉक्स हे वेब ब्राऊजर 2004 आणि गूगल क्रोम 2008 मध्ये आल्यानंतर तसेच अँड्रॉईल म्हणजेच आयओएस सारख्या मोबाईल ऑपरेटींग सिंस्टमची लोकप्रियता वाढल्यानंतर इंटरनेट एक्स्लोरर वापरणाऱ्यांची संख्या काहीशी घटू लागली. जर आपण घरी इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करणारे युजर्स नसेल तर मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, येत्या 15 जून 2022 पासून आपण अत्यंत अधुनिक ब्राऊजींगचा अनुभव घेण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एज वापरण्यास सुरुवात करा.

याशिवाय जर आपण इंटरनेट एक्सप्लोरर वापरणारी संस्था असाल तर आपल्या जवळ लीगेसी इंटरनेट एक्सप्लोरर आधारीत संकेतस्थळं आणि एप्सचा एक मोठा सेट होऊ शकतो. जो काही वर्षांमध्ये बनविण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्टजवळ सुमारे 1675 लीगेसी अॅप्स असल्याचे सांगितले जात आहे. वेब डेव्हलपर्ससाठी मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, त्यांना युजर्सची गरज लक्षात घेऊन इंटरनेट एक्सप्लोरर सपोर्ट समाप्त करण्यासाठी एक योजान बनवायला हवी. कंपनीने पुढे म्हटले आहे की, मायक्रोसॉफ्ट एज ने केवळ इंटरनेट एक्सप्लोररच्या तुलनेत एक सक्षम आणि अधिक सुरक्षीत, अधुनिक ब्राऊजींग सेवा देत आहे. जी अनेक तक्रारी, समस्यांचे निराकरण करुन करण्यात आलीआहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now