Intel Layoffs: इंटेलमध्ये होणार मोठ्या प्रमाणात नोकर कपात; तब्बल 15,000 लोकांना कामावरून काढून टाकले जाणार

पारंपारिक सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत इंटेल ही सर्वात मोठी कंपनी होती. पण एआय सेमीकंडक्टरच्या स्पर्धेत कंपनी खूप मागे आहे.

Intel Lay Off (संग्रहित संपादित प्रतिमा)

Intel Layoffs: या वर्षी अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले (Layoffs) आहे. आता आघाडीची सेमीकंडक्टर कंपनी इंटेल (Intel) देखील मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी करणार आहे. अमेरिकन चिप निर्मात्या इंटेलने गुरुवारी जाहीर केले की, ते त्यांचे कामकाज सुरळीत करण्यासाठी एकूण कर्मचाऱ्यांपैकी 15 टक्के लोकांची कपात करतील. वृत्तानुसार, सध्या इंटेलमध्ये साधारण एक लाख 16 हजार कर्मचारी काम करत आहेत. अशा परिस्थितीत, कंपनी सुमारे 15 ते 18 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाऊ शकते.

अलीकडील तिमाहीत कंपनीला सुमारे $1.6 बिलियनचे नुकसान झाले आहे. छाटणीची ही प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. अत्यंत खराब तिमाही निकाल आणि शेअरच्या सततच्या घसरणीनंतर कंपनीने नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे.

कंपनीचे सीईओ पॅट गेल्सिंगर यांनी एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये म्हटले आहे की, ‘आम्ही प्रमुख उत्पादने आणि तंत्रज्ञानामध्ये टप्पे गाठले असले तरीही, दुसऱ्या तिमाहीत आमची कामगिरी खूपच खराब होती. आमच्या खर्चात कपात करून, आम्ही आमचा नफा सुधारण्यासाठी आणि आमचा ताळेबंद मजबूत करण्यासाठी सक्रिय पावले उचलत आहोत.’

इंटेलला त्याच्या प्रतिस्पर्धी कंपन्या- Nvidia, AMD आणि Qualcomm यांच्याकडून कठीण आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अनेक दशकांपासून, इंटेलने लॅपटॉपपासून डेटा सेंटरपर्यंत सर्व गोष्टींमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप्सच्या बाजारपेठेवर वर्चस्व गाजवले आहे, परंतु अलीकडच्या काही वर्षांत Nvidia सारख्या कंपन्या एआयच्या क्षेत्रात पुढे गेल्या आहेत. इंटेलने जूनमध्ये इस्त्रायलमधील एका मोठ्या कारखान्याच्या प्रकल्पाचा विस्तार थांबवल्याची घोषणा केली होती. कंपनी इस्रायलमधील चिप प्लांटसाठी अतिरिक्त $15 अब्ज गुंतवण्याची योजना आखत होती. (हेही वाचा: Cyberattacks in India: भारतात डेटा भंगाचा विक्रमी उच्चांक, औद्योगिक क्षेत्र सर्वाधिक प्रभावित)

आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी इंटेलने चौथ्या तिमाहीपासूनच लाभांश वितरण थांबविण्याची घोषणा केली होती. जगभरात सध्या डेटा सेंटर सेमीकंडक्टरवर कमी खर्च होत आहे. पारंपारिक सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत इंटेल ही सर्वात मोठी कंपनी होती. पण एआय सेमीकंडक्टरच्या स्पर्धेत कंपनी खूप मागे आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif