Instagram Update: इंस्टाग्रामवर आता लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वरुनही करता येणार Post
फेसबुकच्या मालकीचे असलेले इंस्टाग्राम युजरसाठी खास फिचर घेऊन आलं आहे. आता डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरुनही युजर्संना इंस्टा पोस्ट करता येणार आहेत.
फेसबुकच्या (Facebook) मालकीचे असलेले इंस्टाग्राम (Instagram) युजरसाठी खास फिचर घेऊन आलं आहे. आता डेस्कटॉप (Desktop) किंवा लॅपटॉप (Laptop) वरुनही युजर्संना इंस्टा पोस्ट (Insta Post) करता येणार आहेत. 21 ऑक्टोबर रोजी इंस्टाग्राम अॅपमध्ये भरपूर अपडेट्स येणार आहेत. या अपडेट्समुळे जगभरातील युजर्स त्यांच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करुन फोटोज आणि शॉर्ट व्हिडिओज अपलोड करु शकतात.
या फिचरमुळे इंस्टाग्रामवर चालत असलेले वेगवेगळे व्यवसाय आणि प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व यांना खूप फायदा होईल. त्यांच्या महागड्या कॅमेऱ्यामधून काढलेले फोटोज आणि व्हिडिओज ते आता सहजरित्या अपलोड करु शकतील. जर तुम्ही डेक्सटॉपचा वापर करुन इंस्टाग्रामचा वापर करु इच्छित असाल तर तुमच्या गुगल क्रोम ब्राऊजरवर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा:
# instagram.com वर जा.
# ब्राऊजरच्या सेटिंगमध्ये जा.
# More Tools मध्ये जाऊन डेव्हलपर टूलवर क्लिक करा.
# मोबाईल बटणवर क्लिक करा.
# ‘Responsive’ वर क्लिक केल्यानंतर drop-down menu येईल. यामधून तुम्हाला हव्या असलेल्या मोबाईलचा पर्याय निवडा.
# पेज रिफ्रेश करा आणि तुम्हाला तुमच्या मोबाईल प्रमाणे तुमच्या पीसीवर देखील Instagram feed दिसेल.
तसंच मोबाईल युजर्ससाठी कोलाब फिचर देखील लॉन्च होणार आहे. या फिचरचा वापर करुन दोन व्यक्ती एखादी पोस्ट किंवा रिल शेअर करु शकतील. कोलाब फिचरमध्ये पोस्ट केलेले फोटोज आणि व्हिडिओज हे दोन्ही युजर्सच्या फॉलोअर्संना दिसतील. तसंच या फॉलअर्संना या पोस्ट लाईक आणि कमेंट करता येईल. (Instagram स्टोरी मध्ये लिंक द्यायची असेल तर 'या' सोप्प्या ट्रिकचा वापर करा)
त्याचबरोबर या अपडेटमध्ये रिलसाठी एक नवा इफेक्ट लॉन्च होणार आहे. याचे नाव सुपर बीट असे असेल. गाण्याच्या बीट सोबत तुम्ही स्पेशल इफेक्ट यात अॅड करु शकता. तसेच डायनामिक लिरिक्स हे फिचर देखील या अपडेटमध्ये अॅड होणार आहेत.
तसंच चॅरिटीला प्रोत्साहन देण्यासाठी एका फिचरचे टेस्टिंग चालू असून ते 20 ऑक्टोबरला लॉन्च होण्याची शक्यता आहे. या फिचरद्वारे न्यू पोस्ट बटणचा वापर करुन तुम्ही एक नॉन-प्रॉफिट फंड रेजर सुरु करु शकता. कंपनीने नुकतेच एक क्रॉस पोस्ट फिचर लॉन्च केले होते. ज्याद्वारे फेसबुकवरचे फोटोज आणि व्हिडिओज तुम्ही इंस्टाग्रामवर अपडेट करु शकता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)