Infinix Hot 10 Play स्मार्टफोन लॉन्च; 6000 mAh बॅटरी आणि Helio G25 SoC प्रोसेसर सह काय आहेत फिचर्स? जाणून घ्या

चायनीज स्मार्टफोन ब्रँड Infinix ने आपला नवा मोबाईल लॉन्च केला आहे. 6,000mAh बॅटरी, ड्युअल कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर आणि इतर अनेक फिचर्स यात पाहायला मिळतात. हा स्मार्टफोन 2GB+32Gb या एकाच वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

Infinix Hot 10 Play Smartphone (Photo Credits: Infinix)

चायनीज स्मार्टफोन ब्रँड Infinix ने आपला नवा मोबाईल लॉन्च केला आहे. 6,000mAh बॅटरी, ड्युअल कॅमेरा (Dual Camera), फिंगरप्रिंट सेन्सर (Fingerprint Sensor) आणि इतर अनेक फिचर्स यात पाहायला मिळतात. हा स्मार्टफोन 2GB+32GB या एकाच वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा एची+डिस्प्ले वॉटरड्राप नॉच सह देण्यात आला आहे. हा फोन चार रंगात उपलब्ध आहे- Aegean Blue, Morandi Green, Obsidian Black आणि 7-degree Purple. यात ग्रेझ टेक्सचर पॅटर्न उपलब्ध आहे. (Infinix Note 7 स्मार्टफोन्सचे फिचर्स आणि किंमत, जाणून घ्या)

या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G25 SoC प्रोसेसर देण्यात आला असून 2GB रॅम आणि 32GB इंटनर स्टोरेज देण्यात आला आहे. यासोबतच 512GB पर्यंत एक्सपांडेबल मेमरी स्लॉट देण्यात आला आहे. (Infinix X1 Android स्मार्ट टिव्ही भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

Infinix Hot 10 Play Smartphone (Photo Credits: Infinix)
Infinix Hot 10 Play Smartphone (Photo Credits: Infinix)

या स्मार्टफोनमध्ये 13MP चा मेन सेन्सर आणि AI lens देण्यात आली आहे. तसंच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच 6,000mAh बॅटरी सह 10W चा चार्गिंग सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टीव्हीटीसाठी micro-USB, 3.5mm audio jack देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 10 Go वर आधारीत XOS 7.0 या ऑपरेटिंग सिस्टमवर कार्यरत आहे. दरम्यान, हा स्मार्टफोन सध्या फिलिपिन्समध्ये लॉन्च झाला असून लवकरच इतरत्र लॉन्च होण्याची आशा आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now