IPL Auction 2025 Live

इतक्या स्वस्त दरात Mobile Data Pack जगात कुठेच नाही; जाणून घ्या ठिकाण, जिथे तुम्ही थांबला आहात!

भारत हे आजघडीला आणि नजिकच्या काही काळात स्मार्टफोन निर्मिती, विक्रीसाठी एक मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळेच इथे सर्वात कमी प्रमाणात Mobile Data Pack उपलब्ध करुन दिला जातो.

World’s Cheapest Mobile Data Packs | (Photo credit: archived, edited, symbolic images)

World’s Cheapest Mobile Data Packs: जगभरामध्ये सर्वात स्वस्त किमतीमध्ये इंटरनेट Mobile Data Pack देणारा देश कोणता या प्रश्नाचे उत्तर आता शोधायची काहीच गरज नाही. या पृथ्वीतलावर सर्वात कमी किमती मध्ये इंटरनेट पुरवणारा देश भारतच आहे यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. युजर्सना सर्वाधिक कमी किमतीमध्ये इंटरनेट डेटा देणाऱ्या देशांबाबत इग्लंडमध्ये नुकताच एक अभ्यास झाला. Mobile Data Pack बाबत विशेष अभ्यास करणाऱ्या cable.co.uk संकेतस्थळाने केलेल्या या अभ्यासात हा निष्कर्ष पुढे आला. या संकेतस्थळाने म्हटले आहे की, भारतात एक गीगाबाईट (GB) डेटा केवळ 0.26 डॉलरला मिळतो.

दरम्यान, याच अभ्यासात पुढे आले की, भारताच्या तुलनेत Mobile Data Pack देण्याचे हेच प्रमाण इंग्लंडमध्ये प्रति जीबी 6.66 डॉलर इतके आहे. तर महासत्ता अमेरिकेत हे प्रमाण 13.37 डॉलर प्रति जीबी इतक्या दराने Mobile Data Pack दिला जातो. जागतिक पातळीवर Mobile Data Pack पुरवण्याच्या दराची सरासरी किंमत 852 डॉलर इतकी आहे. Mobile Data Pack विषयी अभ्यास करताना संबंधीत संकेतस्थळाने सुमारे 230 देशांतील Mobile Data Pack दरांचा अभ्यास केला. या अभ्यासानंतर तुलनात्मक पातळीवर निष्कर्ष काढण्यात आले. (हेही वाचा, जास्त पैसे मोजूनही तुमचे इंटरनेट स्लो चालतंय? त्यासाठी आवश्यक आहे 'नेट न्यूट्रॅलिटी')

अभ्यास करुन निष्कर्ष काढताना संकेतस्थळाने म्हटले आहे की, भारतातील युवा पीढी ही तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक जागृत आहे. भारत हे आजघडीला आणि नजिकच्या काही काळात स्मार्टफोन निर्मिती, विक्रीसाठी एक मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळेच इथे सर्वात कमी प्रमाणात Mobile Data Pack उपलब्ध करुन दिला जातो.