Whats App Down: डोन्ट वरी! व्हॉट्स अ‍ॅप पुन्हा डाउन झाला तर करा 'हा' उपाय आणि संभाषणात खंड न पाडता पाठवा सहज मेसेज

तरी याचं बाबतीतील महत्वाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

WhatsApp | Representation Image (Photo Credits: Pixabay)

काल जवळपास दोन तास व्हॉट्स अॅपची सेवा (Whats App Service) जगभरात ठप्प होती. दरम्यान व्हॉट्स अॅपच्या (Whats App) माध्यमातून चालणारे व्यसावसाय (Business), संभाषण (Conversation), व्यवहार ठप्प झाले होते. तरी या दोन तासांत अनेकांचं लाखांचं नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे. व्हॉट्स अॅप हे एक टेक्निकल अॅपलिकेशन (Technical Application) सून ते कधीही डाउन होवू शकत. त्यावर अती अवलंबून राहण म्हणजे अवघडचं. म्हणून यापूढे जर व्हॉट्स अॅप डाउन (Whats App Down) झाल्यास तुमच्याकडे पर्यायी मार्ग असणं आवश्यक आहे. तरी याचं बाबतीतील महत्वाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. म्हणजे यापुढे असं घडल्यास तुमच्या कामात खंड पडणार नाही. व्हॉट्स अॅप हे एक मेसिंजर (Messanger) अपलिकेशन असून व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून तुम्ही मेसेज (messages), कॉल (Call), व्हिडीओ कॉल (Video Call) तसेच मनी ट्रानजिक्शन (Money Transaction) करु शकता. तरी हे सर्व कार्य करण्यासाठी आम्ही तुम्हाला पर्यायी अपलिकेशन सुचवणार आहोत.

 

मेसेज (Message) पाठवण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप (Whats App) ऐवजी टेलीग्राम (Telegram), सिग्नल (Signal), स्नॅपचॅट (Snapchat), इन्स्टाग्राम (Instagram), फेसबुक (Facebook) इत्यादी वापरू शकता. तर व्हिडीओ कॉलसाठी (Video Call) तुम्ही गुगल व्हिडीओ कॉलिंगचा (Google Video Calling) वापर करु शकता. तसेच ऑनलाइन पेमेंटसाठी (Online Payment) तुम्ही गुगल पे (google Pay), फोन पे (Phone Pay), पेटीएम (Paytm), ऑनलाईन बॅंकींचा (Online Banking) वापर करु शकता. (हे ही वाचा:- Good News! Apple कडून खूषखबर, आता iPhone मध्येही वापरता येणार USB Type C चार्जर; लाखो युजर्स ना दिलासा)

 

काल दुपारी साडेबारा पासून जवळजवळ दोन तास व्हॉट्स अॅप डाऊन (Whats App Down) झालं होतं. तोच नेटकऱ्यांनी (Internet Users) ट्वीटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), फेसबूकसारख्या (Facebook) विविध सोशल मिडीयाचा (Social Media) वापर करत व्हॉट्स अॅप डाऊन वर आपल्या प्रतिक्रीया दिल्या होत्या. तरी यापूढे व्हॉट्स अप डाउन झाल्यास पॅनिक न होता तुम्ही या पर्यायी अपलीकेशनचा सहज वापर करु शकता.