हुआवे कंपनीचा भारतात लाँच झालेल्या Huawei MatePad T8 टॅबलेटची 'ही' खास वैशिष्ट्ये पाहून तुम्हीही व्हाल थक्क

या टॅबलेटमध्ये 8 इंचाचा डिस्प्ले (Display) देण्यात आला आहे.

Huawei MatePad T8 Tablet (Photo Credits: Twitter)

सध्याच्या टेक्नोलॉजीच्या जगात माणसाला मोबाईल जितका जवळचा झाला आहे तितकाच टॅबलेटही (Tablet) महत्त्वाचा झाला आहे. आकाराने मोठ्या असलेल्या टॅबलेटचा वापर ऑफिस कामांसाठी किंवा अगदी चित्रपट, वेबसीरिजचा चांगला अनुभव घेण्यासाठी केला जातो. म्हणूनच हुआवेने (Huawei) आपला नवा टॅबलेट MatePad T8 लाँच केला आहे. या टॅबलेटचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे जबरदस्त वैशिष्ट्ये असलेल्या या टॅबलेटची किंमत 9999 रुपये इतकी आहे. या टॅबलेटमध्ये 8 इंचाचा डिस्प्ले (Display) देण्यात आला आहे.

Huawei MatePad T8 टॅबलेटच्या वायफाय वेरियंटच्या 2GB रॅम RAM) आणि 32GB स्टोरेजची (Storage) किंमत 9,999 रुपये आहे. तर LTE वेरियंट 2GB रॅम आणि 32 GB स्टोरेजची किंमत 10,999 रुपये आहे. याची प्री-ऑर्डर बुकिंग 8 सप्टेंबरपासून सुरु झाली असून उद्या या प्री बुकिंगचा शेवटचा दिवस आहे. त्याचबरोबर हा टॅबलेट अधिकृत रित्या 15 सप्टेंबरला Flipkartवर उपलब्ध होईल. Huawei Freebuds 3i ईअरबड्स भारतात लाँच; 9990 किंमतीत उपलब्ध झालेल्या याचे जबरदस्त फिचर्स पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!

Huawei MatePad T8 टॅबलेट अॅनड्रॉईड 10 वर आधारित असून 10.0.1 वर काम करतो. यात ऑक्टा-कोर मीडियाटेक MT8768 प्रोसेसरसह 2GB रॅम आणि IMG GE8320 GPU देण्यात आला आहे. यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. त्यासोबत यात मायक्रोएसडी कार्डसुद्धा देण्यात आला आहे.

या टॅबलेटमध्ये सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 5MP चा बॅक कॅमेरा तर 2MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्यासोबतच यात 5100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याच्या कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, यात ड्यूल बँड वायफाय, ब्लूटुथ 5.0, LTE, GPS/A-GPS, युएसबी ओटीजी आणि चार्जिंगसह मायक्रो युएसबी पोर्ट दिला गेला आहे.