Wireless Charger खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात घ्या!
युजर्समध्ये या नव्या टेक्निकची क्रेझ पाहायला मिळत आहे. तरी देखील याबद्दल अनेक प्रश्न युजर्सच्या मनात आहेतच.
आजकाल वायरलेस चार्जरचा (Wireless Charger) ट्रेंड आहे. युजर्समध्ये या नव्या टेक्निकची क्रेझ पाहायला मिळत आहे. तरी देखील याबद्दल अनेक प्रश्न युजर्सच्या मनात आहेतच. वायरलेस चार्जर नेमका कोणता चांगला? त्याची निवड कशी करावी? तो सुरक्षित आहे का? असे अनेक प्रश्न युजर्सच्या मनात असतात. तुम्ही देखील वायरलेस चार्जर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या....
# स्मार्टफोनसाठी वायरलेस चार्जर खरेदी करण्यापूर्वी चार्जरचे पावर आऊटपूट तपासा. पावर आऊटपूट अधिक असलेल्या चार्जरची निवड करा. 5W चा चार्जर स्वस्त असू शकतो. मात्र त्याद्वारे फोन चार्ज करण्यास संपूर्ण रात्र लागू शकते. अशावेळी 10W चा चार्जर चांगला पर्याय ठरु शकतो.
# नेहमी योग्य चार्जरची निवड करा. जर तुमचा चार्जर 10W चा असल्यास तुमचा चार्जिंग पॅडही तितक्याच वॉल्टचा असयला हवा किंवा त्यापेक्षा अधिक वॉल्टचा असणे गरजेचे आहे. जर चार्जिंग पॅड कमी वॉल्टचा असल्यास तुमचा फोन अर्धवट चार्ज होईल.
# ब्रँडेड चार्जरचं खरेदी करा. फोन कोणत्याही स्वस्त किंवा बनावट चार्जरद्वारे चार्ज करु नका.
# तुमच्या फोनचा चार्जिंग स्पीड चेक करा. वॉयरलेस चार्जर अॅनरॉईड आणि iOS सोबत वेगळा चार्जिंग स्पीड देतो. अशावेळी वॉयरलेस चार्जर घेण्यापूर्वी फोनचा चार्जिंग स्पीड जरुर चेक करा. चार्जिंग स्पीड योग्य असल्यास वॉयरलेस चार्जरची निवड करा.
या टिप्समुळे तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनसाठी योग्य वायरलेस चार्जर निवडणे अधिक सोपे होईल.