Google Removed 17 Dangerous Apps From Play Store: गूगलने प्ले स्टोअरवरून हटवले 'हे' 17 धोकादायक अॅप; तुम्हीही वापरत असाल तर तात्काळ करा अनइंस्टॉल
सर्च इंजिन कंपनी गुगल अधिकृत प्ले स्टोअरवर केवळ सुरक्षित अॅप्सलाचं परवानगी देते. परंतु, अनेकवेळा काही अॅप यूजर्संच्या सुरक्षितेला हानी पोहोचवू शकता. मात्र, गूगलने प्ले स्टोअरमधून अशी 17 अॅप्स काढून टाकली आहेत.
Google Removed 17 Dangerous Apps From Play Store: सर्च इंजिन कंपनी गुगल अधिकृत प्ले स्टोअरवर केवळ सुरक्षित अॅप्सलाचं परवानगी देते. परंतु, अनेकवेळा काही अॅप यूजर्संच्या सुरक्षितेला हानी पोहोचवू शकता. मात्र, गूगलने प्ले स्टोअरमधून अशी 17 अॅप्स काढून टाकली आहेत. या अॅप्समध्ये धोकादायक मालवेयर असल्याचे आढळले आहे आणि त्यांना फोनवरून त्वरित अनइन्स्टॉल करणं आवश्यक आहे. अहवालानुसार झेस्केलर (Zscaler) च्या सुरक्षा संशोधकाला प्ले स्टोअरवरील 17 अॅपमध्ये जोकर (Bread) मालवेअर आढळले. त्यामुळे Google ने हे 17 अॅप प्ले स्टोअरवरून हटवले आहेत. परिणामी यूजर्संना आता हे धोकादायक अॅप डाऊनलोड करता येणार नाहीत. परंतु, ज्या यूजर्सच्या मोबाईलमध्ये हे अॅप आधीपासून असतील, त्यांनी तात्काळ ते अनइन्स्टॉस करणं गरजेचं आहे. अन्यथा युजर्संचा खाजगी डाटा धोक्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, Zscaler सुरक्षा संशोधक व्हायरल गांधी म्हणाले, "हे स्पायवेअर वापरकर्त्यांचे एसएमएस, संपर्क आणि डिव्हाइसची माहिती चोरण्यासाठी डिझाइन केलेले आहे. तसेच हे वापरकर्त्यांना न कळता वापरकर्त्यांना बर्याच प्रीमियम वायरलेस अॅप्लिकेशन प्रोटोकॉल (डब्ल्यूएपी) सेवांसाठी साइन अप करण्याची परवानगी देते. गूगल सिक्युरिटी टीमची जोकरने फसवणूक केल्याची ही तिसरी घटना आहे. (हेही वाचा -WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅप मध्ये 7 दिवसानंतर आपोआप डिलीट होणार पाठवलेले मेसेजेस, जाणून घ्या काय आहे हे Disappearing Messages फिचर)
गूगल ने Play Store वरून हटवलेल्या अॅपची नावे -
- All Good PDF Scanner
- Mint Leaf Message-Your Private Message
- Unique Keyboard – Fancy Fonts and Free Emoticons
- Tangram App Lock
- Direct Messenger
- Private SMS
- One Sentence Translator – Multifunctional Translator
- Style Photo Collage
- Meticulous Scanner
- Desire Translate
- Talent Photo Editor – Blur focus
- Care Message
- Part Message
- Paper Doc Scanner
- Blue Scanner
- Hummingbird PDF Converter – Photo to PDF
- All Good PDF Scanner
याशिवाय गेल्या महिन्यातही गुगलने प्ले स्टोअर वरून 6 अॅप्स हटवले होते. वर्षाच्या सुरूवातीस, गूगलने ब्लॉग पोस्टमध्ये असेही सांगितले होते की, अलीकडच्या काळात जोकर सर्वात प्रगत आणि धोकादायक मालवेअर आहे. संशोधनानुसार, हे मालवेअर मार्चपासून सक्रिय आहे. या मालवेअरने आतापर्यंत कोट्यावधी अँड्रॉइड वापरकर्त्यांना लक्ष्य केलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)