Google ने Play Store वरून हटवले Android मोबाईल मध्ये Joker Malware टाकणारे 'हे' 11 Apps; ; तुम्ही सुद्धा लगेच करा डिलीट

ग्राहकांच्या सुरक्षेला धोका पोहचवणारा Joker Malware या ऍप्स च्या माध्यमातून Android मोबाईल मध्ये टाकला जात असल्याचे निदर्शनात आल्यावर हा निर्णय घेण्यात आला. प्राप्त माहितीनुसार 2017 पासून गूगल या ऍप्लिकेशन्स च्या कामावर नजर ठेवून होते.

Representative Image (Photo: inquisitr)

युजर्सच्या सुरक्षेसाठी गुगल (Google) ने प्ले स्टोअर (Play Store) वरून 11 ऍप्स हटवल्याचे समजत आहे. ग्राहकांच्या सुरक्षेला धोका पोहचवणारा Joker Malware या ऍप्स च्या माध्यमातून Android मोबाईल मध्ये टाकला जात असल्याचे निदर्शनात आल्यावर हा निर्णय घेण्यात आला. प्राप्त माहितीनुसार 2017 पासून गूगल या ऍप्लिकेशन्स च्या कामावर नजर ठेवून होते. चेक पॉईंट च्या रिपोर्ट नुसार, जोकर मालवेअर चे एक नवे व्हर्जन या सर्व ऍप्लिकेशन मध्ये होते. याद्वारे हॅकर्सना स्मार्टफोन मधील डेटा चोरी करणे सहज शक्य होते. यातून संभाव्य धोका लक्षात घेता त्वरित ही कारवाई गूगल कडून करण्यात आली आहे. आतापर्यंत 11 ऍप्स हटवण्यात आले असून इतर ऍप्स च्या बाबत सुद्धा तपास सुरु असल्याचे समजतेय. TikTok Pro Scam: महाराष्ट्र सायबल सेल कडून टिकटॉक प्रमाणे भासणार्‍या खोट्या अ‍ॅपच्या लिंक्स ओपन न करण्याचं आवाहन; खाजगी माहिती चोरली जाण्याची शक्यता

अलीकडेच भारत सरकारने सुद्धा चीन च्या 59 ऍप्लिकेशन वर भारतात बंदी आणण्याचे जाहीर केले होते, यानुसार, टिकटॉक, हॅलो ऍप सहित 59 ऍप्लिकेशन प्ले स्टोअर व Apple स्टोअर वरून हटवण्यात आले होते. यानंतर आता हे अन्य 11 ऍप्स सुद्धा गूगलने हटवले आहेत, या ऍप्लिकेशन ची यादी खाली देत आहोत तुमच्यापैकीही कोणी याचा वापर करत असल्यास त्वरित हे ऍप तुमच्या मोबाईल मधून डिलीट करण्याचा सल्ला गूगल ने दिला आहे.

गूगल ने प्ले स्टोअर वरून हटवलेल्या Apps ची यादी

चेक पॉईंटच्या च्या रिपोर्टनुसार, जोकर मालवेयर हा गूगलच्या कडक सुरक्षेला छेदून काम करत होता, त्यामुळे गूगल ने आपल्या सुरक्षा पॉलिसी सुद्धा तपासायला सुरुवात केली आहे. या वर्षीच्या सुरुवातीपासूनच गूगल ने 1700 हुन अधिक Apps वर प्रतिबंध लावला आहे.