Google Photos Unlimited Free Storage आज 1जूनपासून संपलं; पहा आता त्याला पर्यायी उत्तम Cloud Storage Plans कोणते?
त्यामध्येच गूगल फोटोजचा समावेश असेल. त्यामुळे आता तुम्हांला 15 जीबी पेक्षा अधिकचे स्टोअरेज हवे असल्यास तुम्हांला त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
Google Photos आज 1 जून 2021 पासून त्यांच्या अनलिमिटेड फोटो स्टोरेजच्या मोफत सुविधेला बंद करत आहे. दरम्यान याबबतची घोषणा त्यांनी मागील वर्षीच केली होती. आता गूगलच्या नव्या नियमावलीनुसार, गुगल अकाऊंट सोबत 15 जीबी फ्री स्टोरेज असेल. त्यामध्येच गूगल फोटोजचा समावेश असेल. त्यामुळे आता तुम्हांला 15 जीबी पेक्षा अधिकचे स्टोअरेज हवे असल्यास तुम्हांला त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. मग आता तुमचे गूगल फोटोज कुठे साठवायचे असा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर त्याचं उत्तर देखील आम्ही घेऊन आलो आहोत. आता यासाठी पर्यायी क्लाऊड स्टोरेजचे प्लॅन कोणते आहेत हे खाली दिले आहेत ते जाणून घ्या आणि पहा तुम्हांला काय मदत मिळतेय का? (नक्की वाचा: Google Photos ची मोफत Unlimited Storage सेवा जून 2021 ला संपणार; स्टोरेज स्पेस सब्सक्रिप्शन साठी असे आहेत सशुल्क प्लॅन्स!).
Degoo:
Degoo हा गूगल फोटोजला पहिला एक उत्तम पर्याय आहे. हा तुम्हांला 100 जीबी फ्री क्लाऊड स्टॉरेज देतो. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार यामध्ये अपलोड केलेली माहिती end-to-end encrypted राहणार. पण 100 जीबी पेक्षा अधिक स्टोरेज हवे असल्याच त्या सुविधा सशुल्क आहेत. यामध्ये 500 जीबी साठी प्रति महिना 220 रूपये, 10TB साठी 735 रूपये प्रति महिना मोजावे लागणार आहेत.
DigiBoxx:
DigiBoxx 20 जीबी फ्री स्पेस देते यासोबत जीमेल इंटिग्रेशन, अनलिमिटेड एक्सटर्नल कोलाबरेशन आणि end-to-end encrypted मिळणार आहे. यासोबत सोबत सशुल्क सेवेमध्ये प्रति महिना 30 रूपये 100 जिबी आणि 360 रूपयांत वर्षभराची सोय मिळणार आहे.
Microsoft OneDrive:
मायक्रोसॉफ्टची वन ड्राईव्ह सेवा देखील क्लाऊड स्टोरेज देते. यामध्ये 5 जीबी फ्री स्पेस आहे. यामध्ये ऑटो बॅक अप, ऑटो सिंक इन ही सेवा आहे. 100 जीबी स्टोरेजसाठी प्रति महिना 140 रूपये मोजावे लागणार आहेत. पण तुम्ही Microsoft 365 subscriber असाल तर तुम्हांला वन ड्राईव्ह सर्व्हिस घेण्याची गरज नाही. त्यांना 1TB स्टोरेज मिळतं.
तुम्ही गूगलचाच विचार करत असाल तर आता त्यांच्याकडे 100 जीबी साठी 130 रूपये प्रति महिना आणि वर्षभरासाठी 1300 रूपये मोजावे लागणार आहेत. 200 जीबीसाठी प्रतिमहिना 210 आणि 2 TB साठी 650 रूपये प्रतिमहिना आणि 10 TBसाठी 3250 प्रतिमहिना मोजावे लागणार आहेत.