गुगलचे नवे Dark Web Report फिचर लॉन्च; यासाठी होणार उपयोग
कोणत्या वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती जसे की नाव, जन्मतारीख, फोन नंबर, ईमेल ऍड्रेस लीक झाला तर याची माहिती गुगल तुम्हाला देणार आहे.
ऑनलाइन सेवांचा वापर करणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्याला नेहमीच सायबर धोक्याची चिंता सतावत असते. त्यांचे डिव्हाइस सहजपणे हाक होऊ शकते याची काळजी वापरकर्त्याला असते. सायबर हल्ला झाल्यास ते त्यांचे पैसे आणि डेटा गमावू शकतात. त्यामुळे ऑनलाइन चोरी आणि फसवणुकीपासून आपल्या वापरकर्त्यांची संरक्षण करण्यासाठी गुगलने भारतातील Google One वापरकर्त्यांसाठी ‘डार्क वेब रिपोर्ट’ नावाचे एक नवीन फिचर लॉन्च केले आहे.
डार्क वेब फिचरचा वापर करुन अनेक जण आपली व्ययक्तिक माहिती ही चोरी करत असतात. कोणत्या वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती जसे की नाव, जन्मतारीख, फोन नंबर, ईमेल ऍड्रेस लीक झाला तर याची माहिती गुगल तुम्हाला देणार आहे. गुगलद्वारे देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर वापरकर्ते आपल्या अकाऊंटची सुरक्षा सुनिश्चित करू शकतात.
नियमित Google वापरकर्ते डार्क वेबवर त्यांच्या ईमेल पत्त्याशी छेडछाड झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी देखील हे फिचर वापरू शकतात. मात्र त्यांना गुगल वन वापरकर्त्यांप्रमाणे सतत मॉनिटरिंग उपलब्ध असणार नाही. जर का तुम्ही गुगल वनचे सदस्य आहात तर तुमचे नाव, जन्मतारीख, ईमेल ऍड्रेस तिथे आहेत की नाही हे तपासण्यासाठी डार्क वेब रिपोर्ट फीचरचा वापर करू शकता. रिअल-टाइम अपडेट आणि कोणतेही नवीन सर्च कसे हाताळायचे याबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ते सेट देखील करू शकता.