Google Layoff: गुगलमध्ये पुन्हा कर्मचारी कपात, कोअर टीममधील 200 कर्मचाऱ्यांना काढले; भारत आणि मेक्सिकोमध्ये संबंधित पदे भरण्याची योजना

मात्र, त्या व्यतिरिक्त भारतातील आणि मेक्सिकोमधील अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीशी जोडण्याचा गुगलचा विचार आहे.

Google (PC - Pixabay)

Google Layoff: गुगलने त्यांचे काम आणखी चांगले करण्यासाठी आपल्या "कोअर" टीममधून अंदाजे 200 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. असे केले असले तरी परदेशात, विशेषतः भारत (India)आणि मेक्सिको(Mexico)मध्ये कर्मचारी हायर करण्याच्या योजना आहेत. Google च्या फ्लॅगशिप उत्पादनांच्या तांत्रिक पायासाठी जबाबदार असलेल्या "कोर" टीममधील कर्मचार्यांना टाळेबंदीला सामोरे जावे लागले आहे. कंपनीने भारत आणि मेक्सिकोमधे संबंधित पदे भरण्याची योजना आखली आहे. उच्च-वाढीच्या जागतिक कर्मचा-यांच्या स्थानांकडे वळण्यावर भर दिला आहे.(हेही वाचा : Google Lays Off: गूगल मध्ये टाळेबंदी, शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कपातीची गदा)

Google च्या प्रमुख उत्पादनांचा तांत्रिक आधार तयार करण्यासाठी आणि वापरकर्त्याची ऑनलाइन सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार असलेल्या “कोअर” युनिटची महत्त्वपूर्ण पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान, पायथन विकास, तांत्रिक पायाभूत सुविधा, सुरक्षा फाउंडेशन, ॲप प्लॅटफॉर्म, मुख्य विकासक आणि विविध अभियांत्रिकी भूमिकांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या संघांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुगलने सनीवेल, कॅलिफोर्निया कार्यालयातून किमान 50 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. CNBC ने दिलेल्या अहवालानुसार कंपनी मेक्सिको आणि भारतात संबंधित पदे भरेल असा अंदाज आहे.(हेही वाचा : Google Lays Off: Tech Layoffs March 2024: टेक क्षेत्रातील नोकऱ्यांवर संकट! मार्चमध्ये Apple, Dell, IBM सह अनेक कंपन्यांनी केली नोकर कपात)

न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, Google डेव्हलपर इकोसिस्टमचे व्हीपी असीम हुसेन यांनी Google डेव्हलपर इकोसिस्टम टीमसोबत कर्मचारी कपातीची माहिती शेअर करण्यासाठी एक टाउन हॉल ईमेल केला होता. हुसेन यांनी सांगितले की, हे बदल व्यापक धोरणात्मक उद्दिष्टांचा भाग आहे. ऑनलाइन जाहिरात महसुलात घट झाल्यामुळे, सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची योजना जाहीर करण्यात आली होती.