Google Chrome Update: लवकरच 'या' लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर गुगल क्रोम बंद होण्याची शक्यता; जाणून घ्या सविस्तर
कंपनीने एका सपोर्ट फोरममध्ये जाहीर केले आहे की, गुगल क्रोम Chrome Windows च्या काही सिरीजवर काम करणार नाही आणि त्यामुळे लोकांना नवीन सिस्टम विकत घ्यावी लागू शकते
आपल्या प्रत्येक लहान-मोठ्या प्रश्नाचे उत्तर इतर कोणाकडे असो वा नसो, मात्र गुगलवर (Google) नक्कीच त्याबाबत काहीतरी माहिती मिळते. गुगल हा प्लॅटफॉर्म आपण आपले स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप, संगणक अशा सर्व डिव्हाइसवर वापरतो. सध्या मार्केटमध्ये अनेक सर्च इंजिन आहेत परंतु या यादीमध्ये गुगल क्रोम (Google Chrome) सर्वात लोकप्रिय आहे. परंतु आता काही लॅपटॉप आणि संगणकांवर एका ठराविक तारखेनंतर गुगल क्रोम वापरता येणार नाही.
लवकरच गुगल क्रोम ब्राउझर अनेक पीसी आणि लॅपटॉपवर काम करणे बंद करेल. कंपनीने एका सपोर्ट फोरममध्ये जाहीर केले आहे की, गुगल क्रोम Chrome Windows च्या काही सिरीजवर काम करणार नाही आणि त्यामुळे लोकांना नवीन सिस्टम विकत घ्यावी लागू शकते किंवा त्यांना त्यांचे विंडोज अपडेट करावे लागू शकतात. साधारण 7 फेब्रुवारी 2023 च्या आसपास गुगल क्रोम व्हि 110 (Google Chrome v110) रिलीज झाल्यानंतर हे घडेल.
अहवालानुसार, 10 जानेवारी 2023 पासून Microsoft Windows 7 ESU आणि Windows 8.1 वरील गुगल क्रोम सपोर्ट काढून टाकला जाईल. गुगलने सांगितले आहे की अशा डिव्हाइसेसवर क्रोमचे जुने व्हर्जन काम करेल, परंतु क्रोमचे नवीन अपडेट या डिव्हाइसेसवर येणार नाहीत. तुम्हाला नियमित अपडेट्स आणि नवीन व्हर्जन हवे असेल, तर तुम्हाला Windows 10 आणि Windows 11 वर काम करणारी डिव्हाइसे वापरावी लागतील. (हेही वाचा: Good News! Apple कडून खूषखबर, आता iPhone मध्येही वापरता येणार USB Type C चार्जर; लाखो युजर्स ना दिलासा)
म्हणजेच कंपनीने सांगितले की, जर कोणी अजूनही Windows 7 किंवा Windows 8.1 वापरत असेल आणि त्यांना क्रोमचे सिक्युरिटी अपडेट्स आणि नवीन फीचर्स मिळवायची असल्यास त्यांना आपले डिव्हाइस विंडोजच्या सपोर्टेड व्हर्जनवर अपग्रेड करावे लागेल. दरम्यान, अलीकडे एका अहवालात म्हटले आहे की, गुगल क्रोम हे सर्वात असुरक्षित ब्राउझर आहे. अहवालानुसार ही बाब 1 जानेवारी ते 5 ऑक्टोबर या कालावधीतील डेटाबेसमधील माहितीवर आधारित आहे.